बुलडाणा जिल्ह्यात विविध अपघातात सात ठार
By admin | Published: March 9, 2015 01:55 AM2015-03-09T01:55:37+5:302015-03-09T01:55:37+5:30
७ व ८ मार्च रोजी झालेल्या तीन अपघातात एकूण सात व्यक्ती ठार
बुलडाणा : जिल्ह्यात ७ व ८ मार्च रोजी विविध ठिकाणी झालेल्या अपघातात एकूण सात व्यक्ती ठार झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामध्ये चिखली-मेरा फाट्यादरम्यान ३ ठार, मेहकर- हिवराआश्रम रस्त्यावर २ ठार, तर शेगाव-खामगाव रस्त्यावरील चिंचोली फाट्याजवळ २ व्यक्ती ठार झाल्या आहेत. चिखली-मेरा फाट्याजवळील रामनगर फाट्याजवळ लग्नाचे वर्हाड घेऊन जाणारा ४0७ समोर उभ्या असलेल्या अपघातग्रस्त इंडिकावर आदळून उलटला. त्यामुळे मेटॅडोरमधून रस्त्यावर पडलेल्या वर्हाडां पैकी तिघांना पाठीमागून येणार्या ट्रकने चिरडल्याची घटना ७ मार्च रोजी रात्री १0 वाजता घडली. सिंदखेडराजा तालुक्यातील खैरव येथील प्रल्हाद गरड यांच्या मुलाचे लग्न बुलडाणा तालुक्यातील डोंगरखंडाळा येथे होते. लग्न समारंभ झाल्यानंतर वर्हाड मेटॅडोर ४0७ क्रमांक एम.एच.२८ एच.६५८६ ने खैराव येथे येत असताना चिखली ते मेरा फाट्यादरम्यान रामनगर फाट्याजवळील उतारावर उभ्या असलेल्या अपघातग्रस्त इंडिकावर मेटॅडोर ४0७ आदळल्याने अपघात झाला. यावेळी मेटॅडोरमधून रस् त्यावर पडलेल्या तिघांना पाठीमागून येणार्या ट्रक क्रमांक एच.आर.५५ जी. 0३४६ ने चिरडले. त्यामुळे संतोष विठ्ठल तळेकर (वय ३५), दमोदर त्र्यंबक तळेकर (वय ५0), श्रीकृष्ण प्रकाश गरड (वय २२) रा. खैरव तळेकर हे जागीच ठार झाले. याप्रकरणी आरोपी ट्रकचालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दुसर्या घटनेत मेहकर ते हिवरा आश्रम रस्त्यावरील चांगाडीच्या पुलावर दुचाकीला समोरून येणार्या मिनीबसने धडक दिल्याने दुचाकीवरील दोन जण जागेवरच ठार झाल्याची घटना ८ मार्च रोजी दुपारी २ वाजता घडली आहे. मेहकर येथील मिलिंद नगरातील यादवराव दगडुजी मुळे (५५) व तालुक्या तील बाभुळखेड येथील कमळाजी बाबुराव गायकवाड (४५) हे दोघे जण एम.एच.२८ डब्ल्यू. १६९८ क्रमांकाच्या मोटारसायकलने मेहकरकडून बाभुळखेडला जात होते. दरम्यान, चिखलीवरून मेहकरला येत असलेल्या मेहकर आगाराच्या 0६ एस. ७८९५ क्रमांकाच्या मिनीबसने चांगाडीच्या पुलावर त्यांच्या दुचाकीला जब्बर धडक दिली. त्यामध्ये दुचाकीवरील यादवराव मुळे व कमळाजी गायकवाड हे जागेवरच ठार झाले. याप्रकरणी सुरेश नामदेव खवले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मिनी बस चालक मारोती कुंडलीक झनक विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.