लांडग्याच्या हल्ल्यात सात शेळ्या ठार, एक गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:37 AM2021-08-22T04:37:31+5:302021-08-22T04:37:31+5:30
चांडोळ : येथील शेतकऱ्याच्या गाेठ्यातील शेळ्यांवर लांडग्यांनी हल्ला करून सात शेळ्या ठार केल्या़ तसेच एक शेळी गंभीर जखमी ...
चांडोळ : येथील शेतकऱ्याच्या गाेठ्यातील शेळ्यांवर लांडग्यांनी हल्ला करून सात शेळ्या ठार केल्या़ तसेच एक शेळी गंभीर जखमी झाली़ ही घटना २१ ते २२ ऑगस्टदरम्यान घडली़ या घटनेमुळे अल्पभूधारक शेतकऱ्याचे ९० ते ९५ हजार रुपयांचे नुकसान झाले़
चांडोळ येथील शेतकरी विठ्ठलसिंग कुठबरे यांचे चांडोळ रुईखेड रस्त्यावर शेत आहे़ त्यांनी शेतीला जोडधंदा म्हणून शेळीपालनाचा व्यवसाय सुरु केला होता़ त्यांनी आपल्या शेतातील गोठ्यात आठ शेळ्या बांधल्या होत्या़ २१ ऑगस्टच्या रात्री लांडग्यांनी त्यांच्या कोठ्यावर अचानक हल्ला करून सात शेळ्या ठार केल्या, तर एका बकरीला गंभीर जखमी केले़ ही घटना २२ ऑगस्ट राेजी सकाळी उघडकीस आली़
घटनेची माहिती मिळताच पं.स़ समिती सदस्य विनोद जाधव, ग्रा.पं सदस्य गजानन भोसले, भाग २ चे कोतवाल सुरेश जाधव यांनी घटनास्थळावर भेट दिली़ वन विभागाचे वनपाल एस.ए. अंबेकर, वनरक्षक एस.डी. वानखेडे, वनरक्षक ए.बी. हिवाळे, वनरक्षक एस.डी. भिंगारे, तहसीलच्या चांडोळ भाग-२ च्या तलाठी आर.बी. चव्हाण, कोतवाल सुरेश जाधव यांनी घटनेचा तातडीने पंचनामा केला़
चाैथ्यांदा झाले नुकसान
शेतकरी विठ्ठलसिंग कुंठबरे यांचे एका वर्षाच्या आत चार वेळा नुकसान झाले आहे़ पहिल्या वेळेस हिवाळ्यात गोठा जळून स्प्रिंकलरचे २२ पाइप जळाले होते. ५० हजार रुपयांची गाय मरण पावली होती़ युरिया खत खाल्ल्याने चार शेळ्या मरण पावल्या होत्या़ २१ ऑगस्टला लांडग्यांनी त्यांच्या सात शेळ्या ठार केल्या आहे़ नुकसानग्रस्त शेतकऱ्यास मदत देण्याची मागणी हाेत आहे़