बेंगळुरुनजीक कार अपघातात खामगाचे सात ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2019 06:42 PM2019-05-06T18:42:58+5:302019-05-06T19:04:10+5:30

खामगाव : बेंगळुरु येथील वेल्लमा शहरानजीक झालेल्या कार अपघातात खामगाव येथील ६ जणांसह चालक ठार.

Seven killed in a car accident in Bengaluru | बेंगळुरुनजीक कार अपघातात खामगाचे सात ठार

बेंगळुरुनजीक कार अपघातात खामगाचे सात ठार

googlenewsNext
ठळक मुद्देमिलिंद देशमुख यांच्या कुटूंबातील ६ जण ठार झाले आहेत.ते बेंगळुरु येथे फिरायला गेले होते.

खामगाव : बेंगळुरु येथील वेल्लमा शहरानजीक झालेल्या कार अपघातातखामगाव येथील ६ जणांसह चालक ठार झाल्याची घटना ६ मेरोजी दुपारी २ वाजता घडली. या अपघातात भुसावळ डीआरएम कार्यालयातील कंट्रोल रूम येथे रेल्वे सुरक्षा बलाचे हवालदार मिलिंद देशमुख यांच्या कुटूंबातील ६ जण ठार झाले आहेत. ते बेंगळुरु येथे फिरायला गेले होते.

खामगाव येथील मुळचे रहिवाशी असलेले मिलिंद नारायण देशमुख हे भुसावळ येथे रेल्वे सुरक्षा दलात हवालदार म्हणून कार्यरत होते. त्यांचा लहान भाऊ राजेश देशमुख हा बेंगलोर येथील हवसर येथे खासगी कंपनीत नोकरीला आहे. मुलांसोबत ते आपल्या लहान भावाकडे गेले होते. देशमुख कुटंूंबिय ६ मे रोजी दुपारी १ वाजता कार घेवून फिरायला जात होते. दरम्यान त्यांच्या कारला वेल्लूर जिल्हयातील अंबूर पोलिस स्टेशनअंतर्गत येणाºया वेलम्मा जवळ अपघात झाला. यामध्ये मिलिंद नारायण देशमुख (वय ४५), त्यांची पत्नी किरण मिलिंद देशमुख (वय ३५), मुलगा आदीत्य (वय १२) व अजिंक्य (वय ०७) यांच्यासह राजेश नारायण देशमुख (वय ३७), पत्नी सारिका राजेश देशमुख (वय ३१) अशा सहा जणांसह चालक जागेवर ठार झाले. अपघाताची माहिती पोलिसांकडून त्यांचे भाऊ आनंद देशमुख यांना मिळाली. आनंद देशमुख हे राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांचे अंगरक्षक म्हणून कार्यरत आहेत. या घटनेची माहिती खामगाव येथे मिळताच देशमुख कुटूंबियावर शोककळा पसरली आहे. उद्या संध्याकाळपर्यंत त्यांना खामगाव येथे अंत्यविधीसाठी आणण्यात येणार असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.

Web Title: Seven killed in a car accident in Bengaluru

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.