बुलडाणा जिल्ह्यात कोरोनामुळे सात जणांचा मृत्यू; ५६७  पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 11:12 AM2021-03-13T11:12:57+5:302021-03-13T11:13:03+5:30

Coronavirus in Buldhana शुक्रवारी जिल्ह्यात ५६७ जण कोरोनाबाधित आढळून आ

Seven killed by corona in Buldana district; 567 positive | बुलडाणा जिल्ह्यात कोरोनामुळे सात जणांचा मृत्यू; ५६७  पॉझिटिव्ह

बुलडाणा जिल्ह्यात कोरोनामुळे सात जणांचा मृत्यू; ५६७  पॉझिटिव्ह

googlenewsNext


लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: जिल्ह्यात कोरोनामुळे सात जणांचा मृत्यू झाला असून, यामधील तीन जण खामगाव शहरातील, दोन मोताळा तालुक्यातील आणि प्रत्येकी एक जण चिखली आणि नांदुरा तालुक्यातील आहे. दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत २१५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू असून, जिल्ह्याचा कोरोना मृत्युदर हा १ टक्क्यांवर आहे. दुसरीकडे शुक्रवारी जिल्ह्यात ५६७ जण कोरोनाबाधित आढळून आले.
तपासणी करण्यात आलेल्या १,७६० अहवालांपैकी १,१७७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये  बुलडाणा ७८, सुंदरखेड चार, भादोला ११, दत्तपूर दोन, बिरसिंगपूर एक, घटनांद्रा एक, खेर्डी एक, येळगाव एक,  खामगांव ३५, पिंपरी गवळी एक, पिंप्राळा दोन, कादमापूर एक, सुटाळा एक, शहापूर दोन, गणेशपूर चार, नागापूर एक, टेंभुर्णा २१, लखानवाडा एक, निमगाव पाच, वडनेर एक, आमसरी एक, धानोरा एक, मोमिनाबाद एक, खडत गाव एक, शेलगाव मुकुंद दोन, फुली दोन,  मलकापूर ८४, निमखेड एक, लोणवडी एक, जांभूळ धाबा एक, दाताळा एक,  चिखली ३७, खंडाळा एक, वरुड दोन, मेरा खु. एक, केळवद एक, मलगी एक, शेलूद एक, सवणा एक, दिवठणा एक, भोकरवाडी दोन, कटोडा एक, हातनी एक, माळशेंबा एक, पळसखेड जयंती एक,  सिं.राजा १०, साखरखेर्डा ८, पिंपरखेड ९, दुसरबीड चार, हिवारखेड पूर्णा सात, आडगाव राजा एक, राहेरी खु. एक, कोथळी १२, धा. बढे दोन,  आडविहीर एक, पोफळी एक, राजूर एक, बोराखेडी एक, पि. गवळी दोन, किन्होळा सात, गीरोली एक, रामगाव एक, कुऱ्हा एक,  मोताळा तीन, शेगांव ६५, चिंचोली दोन, गौलखेड एक, खेर्डा दोन, हिंगणा तीन, चिंचखेड एक, सोनाळा एक, वरवट बकाल दोन, शेवगा एक, पातुर्डा दोन, जळगाव जामोद १८, कुरणगड बु. एक, पिंपळगाव काळे दोन, धानोरा दोन,  दे. राजा २१, आळंद एक, पिंपळगाव चि. एक, हिवरखेड चार, अंभोरा एक, अंढेरा एक, चिंचोली बुरुकुल सहा, मेहुणा राजा दोन,  लोणार पाच, सरस्वती एक, हिरडव दोन, मेहकर एक, हिवरा आश्रम तीन, नांदुरा १२ आणि जालना येथील एकाचा यामध्ये समावेश आहे. दरम्यान, ५६१ जणांनी शुक्रवारी कोरोनावर मात केली.  आतार्पंत २० हजार ४३२ जणांनी कोरोनावर मात केली. २,२८६ संदिग्धांच्या अहवालाची सध्या प्रतीक्षा असून, एकूण बाधितांची संख्या २० हजार ४२३  असून त्यापैकी ३,४६९ सक्रीय रुग्ण आहेत.

Web Title: Seven killed by corona in Buldana district; 567 positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.