भरावीच लागणार सात लाखांची रॉयल्टी

By Admin | Published: March 18, 2015 11:51 PM2015-03-18T23:51:09+5:302015-03-18T23:51:09+5:30

चिखली येथील उपविभागीय अधिका-यांनी अपील फेटाळले; मंगरूळ नवघरे ग्रामपंचायतीचे बुडवली होती रॉयल्टी.

Seven lakh royalties will have to be paid | भरावीच लागणार सात लाखांची रॉयल्टी

भरावीच लागणार सात लाखांची रॉयल्टी

googlenewsNext

चिखली (जि. बुलडाणा) : मंगरूळ नवघरे ग्रामपंचायतीला बुडविलेल्या रॉयल्टीपोटी तत्कालीन तहसीलदार बगळे यांनी ठोठावलेली दंडाची रक्कम शासकीय तिजोरीत जमा करावी लागणार आहे.यासंदर्भात उपविभागीय अधिकार्‍यांनी याचिकाकर्त्यांंचे अपील फेटाळले. तालुक्यातील मंगरूळ नवघरे येथे १३ व्या वित्त आयोगांतर्गत केलेल्या रस्त्यांच्या कामासाठी २१९ ट्रॉली मुरुम अवैधपणे वापरून शासनाचा महसूल बुडविला असल्याची बातमी ह्यलोकमतह्णने २१ मार्च २0१३ अंकात प्रसिद्ध करून सरपंच व सचिवाने रॉयल्टी रकमेत केलेला अपहार उघडकीस आणला होता. या बातमीची दखल घेत तत्कालीन तहसीलदार सुरेश बगळे यांनी प्रकरणाच्या चौकशीअंती ७ लाख ८00 रुपये वसूलपात्र दर्शवून सदर दंडाची रक्कम सचिव पी. आय. हिंगे व सरपंच गोदावरी देविदास पठाडे यांनी चलनाद्वारे सरकारी खजिन्यात जमा करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाविरोधात सरपंच व ग्रामपंचायत सचिवाने दाखल केलेल्या अपिलाचा १३ मार्च रोजी निकाल देताना उपविभागीय अधिकारी एस. ए. खांदे यांनी अपीलार्थीचे अपील फेटाळून लावल्याने मंगरूळ नवघरे ग्रामपंचायतीला बुडविलेल्या रॉयल्टीपोटी तत्कालीन तहसीलदार बगळे यांनी ठोठावलेली दंडाची रक्कम तिजोरीत जमा करावी लागेल. सरंपच गोदावरी देविदास पठाडे व ग्रामपंचायत सचिव पी. आय. हिंगे यांनी सन २0१३ मध्ये आपल्या पदाचा दुरुपयोग करून गावातील ग्रामस्थांची दिशाभूल केली व न्यायप्रविष्ट असलेल्या रस्ता कामावर १३ व्या वित्त आयोगांतर्गत रस्ता खडीकरणाचे काम केले. एवढेच नव्हे तर सदर कामासाठी ग्रामपंचायतचा रीतसर ठराव घेतला नाही. टेंडर काढले नाही, निविदा मागविल्या नाहीत वा शासनाच्या कुठल्याही नियमांचे पालन न करता रस्ता कामासाठी वापरण्यात आलेल्या २१९ ट्रॉली मुरुमाच्या रॉयल्टीमध्ये ४३ हजार ८00 रूपयांचा अपहार केला. याबाबत येथीलच दत्तात्रय सीताराम अंभोरे यांच्या तक्रारीवरून जिल्हा खनिकर्म अधिकार्‍यांनी उपरोक्त विषयासंदर्भात सरपंच व सचिवांनी रस्ता खडीकरणाच्या कामासाठी रॉयल्टी न भरता २१९ ट्रॉली मुरुमाचा वापर केला असल्याचे व रॉयल्टी चार्ज ३४ हजार ८00 रुपयांचा भरणा केला नसल्याचे ग्रामपंचायतच्या अभिलेखांवरून आढळून आल्याने या कामासाठी वापरण्यात आलेल्या २१९ ट्रॉली मुरूमाचे रॉयल्टी चार्ज ४३ हजार ८00 रुपये वसुलपात्र ठरवून सदरची रक्कम दंडासह वसूल करण्याबाबत कारवाई करण्याचे निर्देश चिखलीचे तत्कालीन तहसीलदारांना दिले होते.

Web Title: Seven lakh royalties will have to be paid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.