आणखी सात जणांचा मृत्यू, ४०४ पाॅझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:37 AM2021-05-11T04:37:09+5:302021-05-11T04:37:09+5:30
बुलडाणा : जिल्ह्यात काेराेनाचा कहर सुरूच असून साेमवारी आणखी सात जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे़ तसेच ४०४ जणांचा ...
बुलडाणा : जिल्ह्यात काेराेनाचा कहर सुरूच असून साेमवारी आणखी सात जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे़ तसेच ४०४ जणांचा काेराेना अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे़ १०१३ रुग्णांनी काेराेनावर मात केली असून १९८१ अहवाल निगेटिव्ह आले आहेत़
उपचारादरम्यान टेंभुर्णे, ता. खामगाव येथील ६८ वर्षीय महिला, आंबोडा ता. नांदुरा येथील ७० वर्षीय पुरुष, सुटाळा बु, ता. खामगाव येथील ५५ वर्षीय महिला, अभय नगर खामगाव येथील ४२ वर्षीय महिला, पारडा ता. लोणार येथील ६० वर्षीय पुरुष, गांधी नगर चिखली येथील ६१ वर्षीय महिला, वरुड ता. बुलडाणा येथील ६० वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
पाॅझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये बुलडाणा शहर २८, बुलडाणा तालुका ३०, मोताळा शहर ७, मोताळा तालुका ५२, खामगाव शहर २५, खामगाव तालुका ०५, शेगाव शहर ३६, शेगाव तालुका २६, चिखली शहर ०९ , चिखली तालुका २६, मलकापूर शहर ११, मलकापूर तालुका २४, दे. राजा शहर ११, दे. राजा तालुका २१, सिं. राजा शहर ०१, सिं. राजा तालुका १२, मेहकर शहर ३ , मेहकर तालुका ०४, संग्रामपूर तालुका ०९ , जळगाव जामोद शहर ८, जळगाव जामोद तालुका १७, नांदुरा शहर ९, नांदुरा तालुका ०४, लोणार शहर ०४, लोणार तालुका ०८, इतर जिल्ह्यांतील ४ रुग्णांचा समावेश आहे़ तसेच आज १०१३ रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे.
४८१ जणांचा मृत्यू
तसेच आजपर्यंत ३ लाख ८९ हजार १८४ अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. आज राेजी ३ हजार ९१९ नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल ३ लाख ८९ हजार १८४ आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण ७२ हजार ८१ कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी ६७ हजार २२७ कोरोनाबाधीत रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रुग्णालयात ४ हजार ३७३ कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत ४८१ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.