सात नोडल अधिकार्यांची नियुक्ती
By admin | Published: September 13, 2014 12:14 AM2014-09-13T00:14:40+5:302014-09-13T00:14:40+5:30
विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी सात नोडल अधिकार्यांची नियुक्ती.
बुलडाणा : जिल्हयातील विधानसभा मतदार संघाच्या निवडणूकीसाठी लोकसभा निवडणूकीप्रमाणे सात नोडल अधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच लोकसभा निवडणूकीकरीता मनुष्यबळ नियोजनासाठी मुख्य निवडणूक आयुक्त यांच्या मान्यतेने तयार करण्यात आलेल्या सॉफ्टवेअरमध्ये एकूण ११ हजार ९४७ इतके मनुष्यबळाची माहिती टाकण्यात आली होती. सदर माहितीचा उपयोग विधानसभा निवडणूकीतही करण्यात येणार आहे. याशिवाय मतदान केंद्राचे मुल्य निर्धारन करण्यात आले असून किमान मुलभूत सुविधा, छत, पाणी, विद्युत पुरवठा, रॅम्प आदी म तदानासाठी आवश्यक बाबींची तपासणी करण्याबाबत मतदार नोंदणी अधिकार्यांना सुचना देण्यात आल्या आहेत.याशिवाय लोकसभा निवडणूकीप्रमाणे मिडीया सर्टीफिकेशन आणि मॉनिटेरींग कमिटी तयार करण्यात आली असून सदर कमिटीचे पुर्नगठण करण्यात आले आहे. याबाबत संबंधीत अधिकार्यांना सुचना दिल्या आहेत.