कोलवड येथे सात पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 05:02 AM2021-03-13T05:02:48+5:302021-03-13T05:02:48+5:30
बुलडाणा : तालुक्यातील कोलवड येथे ११ मार्च रोजी सात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. त्यांना उपचारासाठी कोविड केअर सेंटरमध्ये ...
बुलडाणा : तालुक्यातील कोलवड येथे ११ मार्च रोजी सात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. त्यांना उपचारासाठी कोविड केअर सेंटरमध्ये भरती करण्यात आले आहे. कोरोनाबाधितांची संख्या चिंताजनक आहे. ग्रामीण भागातही रुग्ण वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
एकाच दिवसात तीन हजारांवर लसीकरण
बुलडाणा : जिल्हा सामान्य रुग्णालयासह उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्येही कोरोना लसीकरण सुरू आहे. या लसीकरणाची व्याप्ती हळूहळू वाढविण्यात येत आहे. जिल्ह्यात सध्या दिवसाला ३ हजार २९४ जणांना कोरोना लस दिली जात आहे. आतापर्यंत २९ हजार ६०७ पेक्षा अधिक लोकांना लस देण्यात आलेली आहे.
दहावी, बारावी परीक्षांची तयारी
बुलडाणा: दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा जवळ आल्या आहेत. त्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाच्या काळात या परीक्षा सुरक्षित वातावरणात घेण्याबरोबरच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी शिक्षण विभागाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.
ग्रामपंचायतमध्ये अतिक्रमाणाचा प्रश्न
बुलडाणा: जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणूका मागील महिन्यात पूर्ण झाल्या. आता ग्रामपंचायतचा कारभार सुरळीत सुरू झाला आहे. त्यामुळे गावातील अतिक्रमाणाचा मुद्दा आता डोकेवर काढत आहे, परंतु अतिक्रमण हटविताना बहुतांश ठिकाणी काही ग्रामसेवकांचा हस्तक्षेप वाढत असल्याचे दिसून येते.
महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार
बुलडाणा: तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रामधील महिला कर्मचाऱ्यांचा ८ मार्च महिला दिनानिमित्त सत्कार करण्यात आला. यावेळी आरोग्य कर्मचारी महिलांनी कोरोनाच्या काळात रुग्णांची सेवा करून गावागावात केलेले सर्वे व इतर कामाचा हा गौरव आहे. सामाजिक संघटनांद्वारे महिलांचा सन्मान करण्यात आला.
रेस्टॉरंटमधील ग्राहकांची संख्या पुन्हा घटली
बुलडाणा: कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आलेली आहे. त्यामुळे रेस्टॉरंटही लवकरच बंद करावी लागत आहे. परिणामी, सध्या रेस्टॉरंटमधील ग्राहकांची संख्या पुन्हा घटली आहे. त्यामुळे रेस्टॉरंट चालकांवर संकट कोसळले आहे.
---------------