जिल्हा सामान्य रुग्णालयात सात गर्भवतींनी घेतली काेराेनाची लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:23 AM2021-07-20T04:23:57+5:302021-07-20T04:23:57+5:30

गर्भवतींसह स्तनदा मातांसाठीही सुरक्षित असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने मान्य केले आहे. त्यामुळे गर्भवतींना लसीकरणासही परवानगी देण्यात आली आहे. मात्र, ...

Seven pregnant women were vaccinated at the district general hospital | जिल्हा सामान्य रुग्णालयात सात गर्भवतींनी घेतली काेराेनाची लस

जिल्हा सामान्य रुग्णालयात सात गर्भवतींनी घेतली काेराेनाची लस

Next

गर्भवतींसह स्तनदा मातांसाठीही सुरक्षित असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने मान्य केले आहे. त्यामुळे गर्भवतींना लसीकरणासही परवानगी देण्यात आली आहे. मात्र, लस घेण्यापूर्वी गर्भवतींसह स्तनदा मातांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहनही तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.

दोन जीवांची भीती

कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी लसीकरण करून घेणे महत्त्वाचे आहे. याची पूर्ण कल्पना आहे. पण, पोटात बाळ असल्यामुळे त्याला धोका नको, यासाठी लस घेण्यास हिंमत होत नाही.

गर्भवती स्त्री

कोरोना लस घेणे हे आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित आहे. याची आम्हालाही पूर्ण कल्पना आहे. मात्र बाळाला काही होऊ नये, यासाठी लस घेण्याची हिंमत होत नाही. बाळाचा जन्म झाल्यानंतर लसीकरण करून घेऊ.

गर्भवती स्त्री

न घाबरता लस घ्या...

नागरिकांनी आपआपल्या भागातील केंद्रावर जाऊन लसीकरण करून घ्यावे. लसीकरणापासून काहीही धोका नाही. कोणत्याची प्रकारची शंका मनात बाळगू नये. लसीकरण करून घेण्यासाठी प्रत्येकाने आले पाहिजे.

डॉ. नितीन तडस, जिल्हा शल्य चिकित्सक

जिल्ह्यात झालेले एकूण लसीकरण ७०८९९५

पुरुष ३७७१६७

महिला १६०२४१

गर्भवती महिला : ७

Web Title: Seven pregnant women were vaccinated at the district general hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.