सात हजार विद्यार्थ्यांंचा कोंबून प्रवास

By admin | Published: September 6, 2014 01:07 AM2014-09-06T01:07:17+5:302014-09-06T01:07:17+5:30

खामगाव आगारात बसेस पडताहेत अपुर्‍या; दररोज ७ हजार पासधारक विद्यार्थ्यांंच्या कोंबून प्रवास.

Seven thousand puppies for the trip | सात हजार विद्यार्थ्यांंचा कोंबून प्रवास

सात हजार विद्यार्थ्यांंचा कोंबून प्रवास

Next

खामगाव : खामगाव आगाराच्या एस.टी.बसेसमधून दररोज सात हजार विद्यार्थी अप डाऊन करीत आहेत. परंतु या विद्यार्थ्यांंंच्या प्रवासाकरिता असणार्‍या बसेस अपुर्‍या पडत आहेत. परिणामी दररोज विद्यार्थ्यांंंना एसटीमधून कोंबून प्रवास करावा लागत आहे. तर दुसरीकडे आगारात वाहकाची ३0 पदे रिक्त असल्याने खामगाव आगाराची कसरत होत आहे.
गाव तेथे रस्ता व रस्ता तेथे एस.टी. पोहचली आहे. ग्रामीण भागातील शेवटच्या टोकावर पोहचण्याचे काम एस.टी.ने केले आहे. म्हणून आजही प्रवाशांच्या मनात एसटीचे महत्व अबाधित आहे. खामगाव हे घाटाखाली जिल्ह्याचे मुख्य ठिकाण म्हणून ओळखले जाते. येथे विविध महाविद्यालये, आय.टी.आय. शासकीय तंत्रनिकेतन, इंजिनिअरींग कॉलेज तसेच विविध शैक्षणिक, व्यावसायीक संस्था कार्यरत आहेत. खामगाव हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने शिक्षणाकरिता विद्यार्थ्यांंंचा ओढा येथे वाढला आहे. तालुक्यातील विद्यार्थ्यांंंसोबतच अकोला, जिल्ह्यासह शेगाव, नांदुरा, मेहकर, मलकापूर, जळगाव जामोद, मोताळा या तालुक्यातील पासधारकांची संख्या वाढली आहे. विद्यार्थी तसेच इतर पासधारक सवलतीचा लाभ घेतात. खामगाव आगाराच्या बसेसमधून दररोज ७ हजार पासधारक प्रवास करीत असल्याचे समजते. सकाळी शाळेत येतांना व परत जातावेळेस विद्यार्थ्यांंंची एस टी मध्ये तोबा गर्दी असते. एका बसमध्ये ४४ बसलेले व ११ उभे अशी आसनव्यवस्था असतांना सध्या एका बसमधून १00 पेक्षा जास्त प्रवाशी पर्याय नाही म्हणून प्रवास करीत आहे. यामध्ये विद्यार्थी तर अक्षरश: कोंबले जातात. शाळेत शिकायचे म्हणून विद्यार्थी हे सर्व निमुटपणे सहन करीत आहे. तर दुसरीकडे खामगाव आगारात सद्यास्थितीत ६0 बसेस उपलब्ध आहेत. मात्र यावरही वाहकांची कमतरता असल्याने आगार व्यवस्थापकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. आगारातील एस.टी. बसेसना २५0 पेक्षा जास्त फेर्‍या करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. खामगाव आगारातून लाखनवाडा, शहापूर, पिंपळगाव राजा, माटरगाव, नांदुरा, नागपूर, वर्णा, दिवठाणा, गारडगाव, अटाळी या मार्गावर विद्यार्थ्यांंंची गर्दी मोठय़ा प्रमाणात असल्याने बसगाड्या वाढविण्याची मागणी पालकांमधून होत आहे. तर वरिष्ठ अधिकारी यांनी याकडे लक्ष देवून दखल घेण्याची गरज आहे.
आगारात उपलब्ध बसगाड्या व कर्मचारी यांचा समन्वय साधून प्रवाशांना नियमीत सेवा पुरविण्याचा प्रयत्न चालू आहे. मात्र ऐन वेळेवर तांत्रिक अडचणी वा कर्मचार्‍यांच्या अडचणी पाहता नागरिकांकडून सहकार्याची अपेक्षा असल्याचे आगार व्यवस्थापक सुभाष पाटील यांनी सांगीतले.

Web Title: Seven thousand puppies for the trip

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.