संत विहार कॉलनीत तीव्र पाणी टंचाई; नागरिकांची पालिकेवर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 12:57 AM2018-03-18T00:57:18+5:302018-03-18T00:57:18+5:30
खामगाव(जि.बुलडाणा) : स्थानिक संत विहार कॉलनीत तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. याबाबत वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही पालिका प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या संत विहार कॉलनीतील नागरिकांनी शनिवारी दुपारी पालिकेवर धडक दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव(जि.बुलडाणा) : स्थानिक संत विहार कॉलनीत तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. याबाबत वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही पालिका प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या संत विहार कॉलनीतील नागरिकांनी शनिवारी दुपारी पालिकेवर धडक दिली.
स्थानिक घाटपुरी रोडवरील संत विहार कॉलनीमध्ये नगर पालिका प्रशासनाकडून नळाची पाइपलाइन टाकली आहे. या पाइपलाइनवरून नागरिकांनी नळ कनेक्शनही घेतले आहेत. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून या पाइपलाइनवरून पाणी येत नाही. याबाबत वारंवार पालिका प्रशासनाकडे निवेदनही सादर करण्यात आले. मात्र, अद्यापपर्यंत पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यामुळे शनिवारी नागरिकांनी पालिकेवर धडक दिली. यावेळी उपाध्यक्ष संजय मुन्ना पुरवार, पाणी पुरवठा सभापती ओम शर्मा, नगरसेवक संदीप वर्मा यांनी नागरिकांची समजूत काढली. यावेळी अभिजित बापट, पुरुषोत्तम देशमुख, रणजितबाप्पू देशमुख, लताताई पाटील, ज्योती बुरकुल, गजानन बुरकुल, हरिहर घ्यार, संजय तायडे, प्रकाश पताळे, तेजराव सोळंके, दीपक पाटील, विनोद बलांसे, के. पी. टिकार, एस.एस. खंडारे, सविता उंबरकर, आनंद चांडक, बळवंत देशमुख, विजयसिंह डाबेराव, रवींद्र दिवनाले, अशोक वावगे, अतुलसिंह राजपूत, व्ही. एस. खोडवे, आशिष शेले, विजय पवार, संजीवनी इंगळे, श्रद्धा देशमुख, डॉ. अजय काळे, एम. पी. सदावर्ते, प्रशांत गोंड, जी.डी. मनसुटे, सागर पांडे, नरेंद्र देशमुख, आरती मुळे, गणेश गोमासे, सुरेश खेडकर, गजानन बुरकुल आदींचा समावेश होता.
आंदोलनाचा इशारा
संत विहारमधील पाणी समस्या येत्या २६ मार्चपर्यंत निकाली काढावी; अन्यथा २६ नंतर तीव्र आंदोलनाचाही इशारा निवेदनातून देण्यात आला. दरम्यान, या भागातील पाणी समस्या तत्काळ निकाली काढण्यात येणार असल्याचे आश्वासन उपाध्यक्ष संजय मुन्ना पुरवार यांनी यावेळी उपस्थितांना दिले. यावेळी महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.