विविध मागण्यांसाठी एसएफआयचा मोर्चा
By Admin | Published: September 2, 2014 11:08 PM2014-09-02T23:08:28+5:302014-09-02T23:12:23+5:30
खासगी विद्यापीठ कायदा रद्द करा, या प्रमुख मागणीसाठी स्टुडंटस् फेडरेशन ऑफ इंडियाचा मोर्चा.
खामगाव : खासगी विद्यापीठ कायदा रद्द करा, या प्रमुख मागणीसाठी स्टुडंटस् फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) या संघटनेच्यावतीने उपविभागीय कार्यालयावर आज दुपारी मोर्चा काढण्यात आला.
यावेळी संघटनेच्या पदाधिकार्यांनी तीव्र निदर्शनेकरीत संताप व्यक्त केला. त्यानंतर संघटनेच्या शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकार्यांना निवेदन सादर केले. या मोर्चात एसएफआयचे तालुकाध्यक्ष प्रविण बराटे, सचिव अँड. अविनाश बावस्कर, सृष्टी कविश्वर, योगेश रहाणे, मिलिंद ससाणे, आनंद चाकोते, जयेश जोशी, गोकुळ इंगळे, अतुल बढे, अन्सार अहमद, मो. अन्सार, निकिता अग्रवाल, पूजा सोनटक्के, वेदांती वानखडे, श्रृती पाटील, पायल बुलाणी, नेहा सारडा, सोनल बजाज, प्रिया झुनझुनवाला, कोमल बन्नतवाले, कोमल कीर्तने, शिल्पा देशमुख, सुमेधा गावंडे, मृणाल शेट्ये, पूजा जोशी, स्नेहा मोरे आदी सहभागी झाले होते.