बुलडाणा शहरातील शाहीनबाग आंदोलन स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 12:13 PM2020-03-25T12:13:24+5:302020-03-25T12:13:31+5:30
कुल जामाती तंझीमच्या शिष्टमंडळाने शाहीन बाग धरणे आंदोलन तुर्तास मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: सीएए, एनआरसी व एनपीआर या कायद्या विरोधात कुल जमाती तंझीमच्या बुलडाणा शाखेच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या शाहीन बाग आदोलनास तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे.
स्थानिक जयस्तंभ चौकात हे आंदोलन १७ जानेवारी पासून सुरू आहे. जवळपास ६७ दिवसापासून हे आंदोलन सुरू होते. दरम्यान कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्यभर सुरू करण्यात आलेल्या उपाययोजना आणि लागू करण्यात आलेली संचारबंदी पाहता हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. त्यानुषंगाने २४ मार्च रोजी कुल जामाती तंझीमच्या शिष्टमंडळाने शाहीन बाग धरणे आंदोलन तुर्तास मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना प्रादुर्भावाची स्थिती निवळल्यानंतर हे आंदोलन पुन्हा सुरू करण्यात येईल, असे अनुषंगीक निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.