साखरखेर्डा : शिंगणे महाविद्यालयाजवळ चारचाकी व दुचाकीची धडक; अपघातात महाविद्यालयीन विद्यार्थी ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 19:55 IST2018-01-12T19:46:49+5:302018-01-12T19:55:24+5:30
साखरखेर्डा : साखरखेर्डा ते लव्हाळा या मार्गावर स्व.भास्करराव शिंगणे कला महाविद्यालयाजवळ चारचाकी आणि दुचाकी समोरासमोर धडकून झालेल्या भीषण अपघातात साखरखेर्डा येथील दुचाकीवरील सागर सुस्ते हा महाविद्यालयीन विद्यार्थी ठार झाला तर दुचाकीवरील अन्य दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना १२ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता घडली.

साखरखेर्डा : शिंगणे महाविद्यालयाजवळ चारचाकी व दुचाकीची धडक; अपघातात महाविद्यालयीन विद्यार्थी ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
साखरखेर्डा : साखरखेर्डा ते लव्हाळा या मार्गावर स्व.भास्करराव शिंगणे कला महाविद्यालयाजवळ चारचाकी आणि दुचाकी समोरासमोर धडकून झालेल्या भीषण अपघातात साखरखेर्डा येथील दुचाकीवरील सागर सुस्ते हा महाविद्यालयीन विद्यार्थी ठार झाला तर दुचाकीवरील अन्य दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना १२ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता घडली.
येथील सागर सुस्ते, सागर डुकरे आणि हर्षल गवई हे तिघे महाविद्यालयीन विद्यार्थी ( वय २०) आपल्या पल्सर एम.एच.२८, ४०५ या दुचाकीवरुन लव्हाळ्याकडून साखरखेर्डा येथे येत असताना समोरून येणा-या एम.एच.३७, ०८८५ या चारचाकीची धडक झाली. यात तिघेही विद्यार्थी रस्त्यावर फेकले गेले. यात तिघेही गंभीर जखमी झाले. त्यांना त्वरीत येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर नेण्यात आले. त्यानंतर मेहकर येथे मल्टीस्पेशालीटी रुग्णालयात नेण्यात आले. उपचारादरम्यान सागर सुस्ते याची प्राणज्योत मालवली तर अन्य दोघांवर उपचार सुरू आहे. पोलिसांनी कारमालक निकस रा.सावत्रा याची दुर्घटनाग्रस्त कार पोलीस स्टेशनमध्ये लावली आहे.