शांती महोत्सवाला शतकाची परंपरा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 01:15 AM2017-10-05T01:15:26+5:302017-10-05T01:15:40+5:30

खामगाव: शतकाची परंपरा असलेला शांती(जगदंबा, मोठी  देवी) महोत्सव खामगाव शहरात उत्साहात साजरा करण्यात ये तो.  कोजागरी पौर्णिमेपासून ११ दिवस चालणार्‍या या महोत्सवा त विविध राज्यातून भाविक  खामगाव येथे दाखल होत  असल्याने, या उत्सवाचे महत्त्व १0९ वर्षानंतरदेखील अबाधित  आहे.

Shanti Mahotsav's century tradition! | शांती महोत्सवाला शतकाची परंपरा!

शांती महोत्सवाला शतकाची परंपरा!

Next
ठळक मुद्देदेशात केवळ खामगावात होते जगदंबेची स्थापनादर्शनासाठी देशाच्या कानाकोपर्‍यातून भाविकांची उपस्थिती!

अनिल गवई । 
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: शतकाची परंपरा असलेला शांती(जगदंबा, मोठी  देवी) महोत्सव खामगाव शहरात उत्साहात साजरा करण्यात ये तो.  कोजागरी पौर्णिमेपासून ११ दिवस चालणार्‍या या महोत्सवा त विविध राज्यातून भाविक  खामगाव येथे दाखल होत  असल्याने, या उत्सवाचे महत्त्व १0९ वर्षानंतरदेखील अबाधित  आहे.
  या उत्सवात जगदंबा म्हणजेच मोठी देवीची कोजागिरी  पौर्णिमेस मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येते. या दिवसापासूनच  पुढील अकरा दिवस हा उत्सव चालतो. विजयादशमीला  असुरांचा संहार करून देवी परत आल्यानंतर, देवीचा चेहरा  क्रोधीत असल्याने लाल झालेला असतो. त्यामुळे  म्हणून या  देवीचा चेहरा लाल रंगाचा करण्यात येतो. तसेच देवीला शांत  करण्याकरिता पूजा, अर्चना, आराधना केली जाते. त्या उ त्सवाला शांती उत्सव असे म्हटले जाते. जंगदबा उत्सव, मोठी  देवी उत्सव केवळ खामगावातच साजरा होत असल्याने, या उ त्सवाला वेगळे महत्त्व असून एक वेगळीच परंपरा हा उत्सव  राखून आहे. नवसाला पावणारी म्हणून अख्ख्या भारतात जिची  ख्याती आहे, त्याच जगदंबेला खामगाव येथे मोठय़ा सन्मानाने  मोठी देवी म्हणून संबोधण्यात येते.  
दरम्यान, श्री जगदंबा सार्वजनिक उत्सव मंडळाच्यावतीने शहरा तील जलालपुरा भागात अनेक वर्षापासून तर खामगाव शहरात  सन १९0८ पासून  साजरा होणारा जगदंबा मातेचा उत्सव आता  खामगाव शहर आणि परिसरातील खेड्यापाड्यात ठिकठिकाणी  उत्साहाने साजरा करण्याची प्रथा सुरू झाली आहे. आंध्रप्रदेशात  निजामाबाद जिल्ह्यात बोधन  गाव आहे.  नांदेड जिल्ह्याची  सीमा संपल्यानंतर महाराष्ट्र सिमेनंतर आंध्र सिमेस प्रारंभ होतो व  सिमेपासून काही अंतरावर हरीद्रा नदी वाहते. या नदीच्या काठी  मातेचे पूर्वी स्थान होते. कालांतराने ते बोधन गावच्या मध्यभागी  मातेचे जागृत स्थान स्थायीक झाले. तेथूनच देवी खामगावात  आली.   कै.कैरन्ना आनंदे हे लोहगाव येथील रहिवासी होते.  बिड्याच्या व्यवसायाकरिता लागणार्‍या पानाच्या व्यवहाराकरिता  बोधन येथे त्यांचे येण-जाणे राहायचे. त्यामुळे ते बोधनच्या मा तेचे भक्त झाले. लोहगाव येथे मातेच्या मूर्तीची स्थापना करून उ त्सव साजरा करत. कालांतराने ते बिड्याच्या व्यवसायाकरिता  खामगाव शहरात येऊन आपला व्यवसाय सुरू केला. त्यानंतर  खामगावात त्यांनी आपल्या स्वत:च्या बिडी कारखान्यातील सर्व  जातीधर्माच्या कामगारांच्या सहाय्याने हा उत्सव सुरू केला. हीच  प्रथा सुरू आहे.

दर्शनासाठी देशाच्या कानाकोपर्‍यातून भाविकांची उपस्थिती!
या उत्सवाकरिता भक्तगण अतिश्रद्धेने मुंबई, पुणे, नागपूर,  तुळजापूर, बडोदा, कोल्हापूर तसेच महाराष्ट्रातील कानाको पर्‍यातून देवीच्या दर्शनाकरिता भाविक खामगाव येथे येतात. ही  देवी जागृत मानली जात असल्याने भाविकांसाठी या उत्सवाचे  वेगळेच असे महत्त्व आहे. उत्सवामध्ये जगदंबेच्या दर्शनासाठी  भक्तांकरिता २४ तास आईचा दरबार खुला असतो. दरम्यान, उ त्सव काळात दहा दिवस भाविक स्त्री-पुरूष यांच्याकडून दान  केलेल्या साड्या, पातळे, चोळ्या यांचे गरजुंना वाटप केल्या जा ते. मोठी देवी संस्थानचे विद्यमान विश्‍वस्तांपैकी जगन्नाथ  आगीनकर ज्येष्ठ सदस्य आहेत आहे. त्यांच्या पहाडी आवाजा तून गायलेल्या जगदंबेच्या आरत्या जोगवा सर्वांच्या स्वरातून  उठून निघतात. 

Web Title: Shanti Mahotsav's century tradition!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.