शरद पवारांनीच लावली शेतकऱ्यांची वाट -  प्रा. श्रीकांत तराळ यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2018 03:58 PM2018-08-01T15:58:07+5:302018-08-01T15:59:41+5:30

खामगाव: राज्यात जाणता राजा म्हणून स्वत:ची ओळख निर्माण करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीच शेतकऱ्यांची वाट लावली, असा सणसणाटी आरोप राष्ट्रीय किसान महासंघाचे संयोजक तथा किसान अधिकार यात्रेचे आयोजक श्रीकांत तराळ यांनी बुधवारी येथे केला.

Sharad Pawar made bigest loss of farmers - Srikant Taral | शरद पवारांनीच लावली शेतकऱ्यांची वाट -  प्रा. श्रीकांत तराळ यांचा आरोप

शरद पवारांनीच लावली शेतकऱ्यांची वाट -  प्रा. श्रीकांत तराळ यांचा आरोप

Next
ठळक मुद्देराष्ट्रीय किसान महासंघाच्या किसान अधिकार यात्रेसंदर्भात माहिती देण्यासाठी ते खामगावात आले असता, त्यांनी उपरोक्त गौप्यस्फोट केला. ‘ओठात एक आणि पोटात दुसरे’ हेच धोरण शरद पवारांचे राहीले आहे.

खामगाव: राज्यात जाणता राजा म्हणून स्वत:ची ओळख निर्माण करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीच शेतकऱ्यांची वाट लावली, असा सणसणाटी आरोप राष्ट्रीय किसान महासंघाचे संयोजक तथा किसान अधिकार यात्रेचे आयोजक श्रीकांत तराळ यांनी बुधवारी येथे केला.
राष्ट्रीय किसान महासंघाच्या किसान अधिकार यात्रेसंदर्भात माहिती देण्यासाठी ते खामगावात आले असता, त्यांनी उपरोक्त गौप्यस्फोट केला. स्थानिक पत्रकार भवनात आयोजित पत्र परिषदेत ते बोलत होते. शरद पवार हे राज्याचे मोठे नेते आहेत. केंद्रात दहा वर्ष कृषीमंत्री म्हणूनही त्यांनी कार्यभार सांभाळला आहे. शेतकरी नेत्यासोबतच एक प्रबळ मराठा नेते म्हणूनही पवारांची राज्यात ‘पॉवर’आहे. पवारांच्याच कार्यकाळात सन २००४ मध्ये स्वामीनाथन आयोगाची स्थापना झाली. २००६ मध्ये स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी आल्या. या शिफारशी आल्यानंतर ११ सप्टेंबर २००७ रोजी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार सरकारने एक शेतकरी निती तयार केली. ४० पानांच्या या निती धोरणावर शरद पवारांची कृषीमंत्री म्हणून स्वाक्षरी आहे. पवारांच्या कार्यकाळात स्वामीनाथन आयोग लागू होईल, अशी अशा पल्लवित झाली होती. मात्र, दुर्दैवान २०१३ पर्यंत स्वामीनाथन आयोगाविषयी कुठेही चर्चा नाही. तथापि, कुठल्याही आयोगाच्या शिफारशी स्वीकारल्यानंतर त्या लागू कराव्या लागतात. २००७ मध्ये स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी शरद पवार कृषीमंत्री असताना स्वीकारण्यात आल्या. मात्र, त्यानंतर या धोरणाबाबत देशात आणि राज्यात कोणतीही अंमलबजावणी करण्यात आली. हे शेतकऱ्यांचे दुर्दैवच म्हणावे लागेल. ‘ओठात एक आणि पोटात दुसरे’ हेच धोरण शरद पवारांचे राहीले आहे. त्यामुळे पवारांच्या शेतकºयांविषयी असलेल्या आस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होते, असेही प्रा. तराळ शेवटी म्हणाले.

स्वामीनाथन आयोगाचा उल्लेखही टाळल्या जातो!
शरद पवार त्यांच्या भाषणात स्वामीनाथन हा शब्द वापरत नाहीत. तर स्वामीनाथन कमिटी हा उल्लेख ते जाणीवपूर्वक करतात. याचा अर्थ पत्रकारांनीच त्यांना विचारावा, असा प्रतिप्रश्नही त्यांनी उपस्थित केला. कमिशन या व्यापक अथार्लाही त्यांच्याकडून अतिशय क्षुल्लक दृष्टीकोनातून पाहण्यात येते. ही बाब जाणता राजाला साजेशी नसल्याची स्पष्टोक्तीही प्रा. तराळ यांनी जोडली.

 

Web Title: Sharad Pawar made bigest loss of farmers - Srikant Taral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.