"" ती "" व्हायरल पोस्ट जिल्हा माहिती कार्यालयाकडून प्रसारित नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:26 AM2021-04-29T04:26:05+5:302021-04-29T04:26:05+5:30
बुलडाणा : २५ एप्रिलपासून जिल्ह्यात सामाजिक माध्यम व्हॉट्स ॲप वर लवकरच कोरोना तिसऱ्या स्टेजला पोहोचणार असून सर्वांनी अतिदक्षता ...
बुलडाणा : २५ एप्रिलपासून जिल्ह्यात सामाजिक माध्यम व्हॉट्स ॲप वर लवकरच कोरोना तिसऱ्या स्टेजला पोहोचणार असून सर्वांनी अतिदक्षता पाळण्याच्या जिल्हाधिकारी यांच्या सूचना असा संदेश फिरत आहे. असा कुठलाही संदेश जिल्हा माहिती कार्यालय अथवा जिल्हाधिकारी कार्यालय मार्फत सामाजिक माध्यमांवर प्रसारित करण्यात आलेला नाही. ती पोस्ट जिल्हा माहिती कार्यालयाकडून प्रसारित करण्यात आलेली नाही.
कुणी तरी जिल्हा माहिती कार्यालयाने ग्रुप वर प्रसारित करावी असा संदेश देत ही पोस्ट प्रसारित केली आहे. तरी कुणीही जिल्हा माहिती कार्यालयाच्या नावाने अशी पोस्ट प्रसारित करू नये. कुणीही अफवा, खोटी माहिती प्रसारित करीत असल्याचे निदर्शनास आल्यास दोषींवर साथरोग अधिनियम, आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात येईल. तरी प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे अधिकृतरित्या जिल्हा माहिती कार्यालय प्रसारण करते. नागरिकांनी अशा कुठल्याही अफवा, खोट्या माहितीवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे. नागरिकांनी कोरोना संसर्गापासून वाचण्यासाठी मास्क वापरावा, हात वारंवार स्वच्छ धुवावे किंवा सॅनिटाइज करावे, सामाजिक सुरक्षा अंतराचे पालन करावे किंवा गर्दीत जाणे टाळावे आदींचे पालन करावे, असे आवाहनही जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.