शेगाव : भट्टड जीनला आग, कापूस जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2018 02:04 AM2018-01-26T02:04:29+5:302018-01-26T02:04:51+5:30
शेगाव : येथील भट्टड जीनमध्ये २५ जानेवारी रोजी दुपारी दरम्यान कापसाच्या गंजीला आग लागली. या आगीत शेकडो क्विंटल कापूस जळून खाक झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
शेगाव : येथील भट्टड जीनमध्ये २५ जानेवारी रोजी दुपारी दरम्यान कापसाच्या गंजीला आग लागली. या आगीत शेकडो क्विंटल कापूस जळून खाक झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
शेगाव शहराच्या मध्यभागी बसस्थानकाजवळच असलेल्या भट्टड परिवाराच्या मालकीची असलेली भट्टड जीन परिसरात मोठय़ा प्रमाणात कापसाच्या गंजी पडलेल्या होत्या. गुरुवारी २५ जानेवारी रोजी कापसाच्या जीनींगचे काम सुरु असताना तेथे कापसाच्या गंजीतून धुर निघताना दिसला. यावेळी एकच खळबळ उडून भट्टड जीनचे मालक यांनी तात्काळ शेगाव नगरपालिकेच्या व खामगाव नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारणा करण्यासाठी दुरध्वनी केला. काही वेळातच शेगाव नगरपरिषदेचे अग्नीशमन घटनास्थळावर पोहचले. तोपर्यंत आगीने उग्ररुप धारण केले होते. या आगीमध्ये शेकडो क्विंटल कापूस जळून खाक झाले होते. नागरिकांनी आग विझविण्यासाठी सहकार्य केले.