शेगावच्या केंद्रावर शेतकऱ्यांचा राडा!

By admin | Published: February 15, 2017 03:09 AM2017-02-15T03:09:15+5:302017-02-15T03:09:15+5:30

आपल्या कृषिमालाकडे दुर्लक्ष करून व्यापाऱ्यांनी आणलेल्या मालाची खरेदी करण्यास प्राधान्य देत असल्याचे लक्षात येताच शेतकऱ्यांनी

Shegaon center farmers rada! | शेगावच्या केंद्रावर शेतकऱ्यांचा राडा!

शेगावच्या केंद्रावर शेतकऱ्यांचा राडा!

Next

शेगाव (जि. बुलडाणा) : आपल्या कृषिमालाकडे दुर्लक्ष करून व्यापाऱ्यांनी आणलेल्या मालाची खरेदी करण्यास प्राधान्य देत असल्याचे लक्षात येताच शेतकऱ्यांनी येथील नाफेडच्या तूर खरेदी केंद्रावर राडा केला व केंद्र बंद पाडले.
बाजारपेठेमध्ये सध्या तुरीची आवक वाढू लागली असून खुल्या बाजारात तुरीचा दर ३९०० ते ४५०० दरम्यान होता. नाफेडमार्फत सुरू असलेल्या खरेदी केंद्रावर हमीभाव ५०५० रुपये आहे. परिणामी या केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी होत आहे. शेगाव येथील नाफेडच्या व्यापाऱ्यांचाच माल प्राधान्याने मोजला जात असल्याचे लक्षात येताच संतप्त शेतकऱ्यांनी ही खरेदी बंद पाडली. (प्रतिनिधी)

Web Title: Shegaon center farmers rada!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.