लाखो भाविकांच्या उपस्थितीत शेगावात श्रींचा पुण्यतिथी उत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2017 08:09 PM2017-08-26T20:09:54+5:302017-08-26T20:15:21+5:30

श्री गजानन महाराज संस्थानच्यावतीने श्रींचा १0७ वा पुण्यतिथी उत्सव सोहळा २६ ऑगस्ट रोजी लाखो भाविकांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांनी साजर करण्यात आला.

shegaon death anniversary celebrated | लाखो भाविकांच्या उपस्थितीत शेगावात श्रींचा पुण्यतिथी उत्सव

लाखो भाविकांच्या उपस्थितीत शेगावात श्रींचा पुण्यतिथी उत्सव

Next
ठळक मुद्दे५४0  दिंड्यांची हजेरी मंडळांना भजनी साहित्य वाटप

गजानन कलोरे 
 शेगाव (बुलडाणा) : श्री गजानन महाराज संस्थानच्यावतीने श्रींचा १0७ वा पुण्यतिथी उत्सव सोहळा २६ ऑगस्ट रोजी लाखो भाविकांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांनी साजर करण्यात आला. कार्यक्रमाला ५४0 भजनी दिंड्यांची उपस्थिती होती.
संत गजानन महाराज पुण्यतिथी उत्सवानिमित्त शनिवारी सकाळी ७ ते ९ दरम्यान हभप श्रीरामबुवा ठाकूर यांच्या मंदिरात  कीर्तन झाले. श्री गणेशयाग व वरुणयागाची पूर्णाहूती २६ ऑगस्ट रोजी सकाळी १0 वाजता संस्थानचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. यानंतर लाखो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. रविवारी हभप श्रीधर बुवा आवारे यांचे सकाळी ६ ते ७ काल्याचे कीर्तन व नंतर दहीहांडी गोपाळकाळा होईल. यानंतर उत्सवाची सांगता होणार आहे. संस्थानच्यावतीने मंदिरात दर्शनासाठी नियोजनबध्द व्यवस्था एकेरी मार्गाने केल्यामुळे भक्तांनी रात्रंदिवस श्रींच्या समाधीचे शिस्तीत दर्शन घेतले. 
यावेळी संस्थानचे विश्‍वस्त निळकंठदादा पाटील, नारायणराव पाटील, अध्यक्ष डॉ. रमेशचंद्र डांगरा, गोविंदराव कलोरे, अशोकराव देशमुख, पंकज शितूत, विश्‍वेश्‍वर त्रिकाळ, किशोर टांक, चंदुलाल अग्रवाल यांच्यासह ब्रम्हवृंद यांची उपस्थिती होती.
 
श्रींची नगरपरिक्रमा 
श्रींच्या पालखीची दुपारी दोन वाजता रथ, मेणा गज, अश्‍वासह नगर परिक्रमा झाली. पुण्यातिथी उत्सवानिमित्त ५४0 भजनी दिंड्यांचा सहभाग नोंदविला. १३0 भजनी मंडळांना भजनी साहित्य वितरण करण्यात आले. भजनी दिंडीत १३ हजार ४३५ वारकरी सहभागी झाले होते.  
 

Web Title: shegaon death anniversary celebrated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.