शेगाव -कन्नड बस झाडावर आदळली, १३ प्रवासी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 04:01 PM2018-12-23T16:01:07+5:302018-12-23T16:01:40+5:30
दुधा (बुलडाणा) : बस झाडावर आदळल्यामुळे १३ प्रवासी जखमी झाल्याची घटना २३ डिसेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास दुधा जवळील मर्दडी घाटात घडली.
दुधा (बुलडाणा) : बस झाडावर आदळल्यामुळे १३ प्रवासी जखमी झाल्याची घटना २३ डिसेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास दुधा जवळील मर्दडी घाटात घडली. बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा अपघात झाला. जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कन्नड आगाराची एम. एच. ४० एन. ९९४० कम्रांकाच्या शेगाव -कन्नड बसला मर्दडी घाटातील वळणावर अपघात झाला. अचानक बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे बस झाडावर आदळली. त्यामुळे चालक, वाहकासह बसमधील प्रवाशी जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली. जखमींपैकी १३ जणांना तत्काळ १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर इतर किरकोळ जखमी प्रवासी दुसºया वाहनाने पुढील प्रवासाला गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. जखमींची प्रकृती चांगली असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
अशी आहेत जखमींची नावे
जखमींमध्ये उमेश बावस्कर वय २३ रा. म्हसला, देविदास हिवाळकर वय ६५ रा. देऊळघाट, शे. नसरोद्दीन वय ३५ रा. भोपाळ गांधीनगर, प्रवीण गोरे वय ३० रा. सागवन, साहेबराव सोनुने वय ७० रा. चांडोळ, शे. महमंद शे. चाँद वय ६८ रा. पारध, पवन हुडेकर वय १९ रा. नांद्राकोळी, गणेश हिवाळकर वय ५५ रा. देऊळघाट, चालक सुरेश पगार, विजय हिवाळकर वय ४० रा. देऊळघाट, कांताबाई हिवाळकर वय ५० रा. देऊळघाट, वृषाली भोसले वय २३ रा. बेलोरा ता. भोकरदन, सुलोचना भोंडे वय ४५ रा. म्हसला यांचा समावेश आहे.
चौघांनाच जाता आले अंत्यसंस्काराला
देऊळघाट येथील हिवाळकर कुटूंबातील आठ सदस्य रविवारी सिल्लोड तालुक्यातील डोंगरगाव येथे नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारासाठी जात होते. सकाळी बुलडाणा बसस्थानकामधून ते शेगाव- कन्नड बसमध्ये बसले. दुधा जवळील मर्दडी घाटामध्ये बसला अपघात झाला. यामध्ये हिवाळकर परिवारातील चार जण जखमी झाले. जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर इतर चौघांना किरकोळ दुखापत झाल्याने ते अंत्यसंस्कारासाठी रवाना झाल्याची माहिती जखमींनी दिली.
स्टेअरिंग ओढू लागले उजव्या बाजूने
शेगाव- कन्नड बसच्या चालकाने मर्दडी घाटातील मोठे वळण पार केले. मात्र त्यानंतर स्टेंअरिंग उजव्या बाजूने ओढू लागले. काही केल्या स्टेअरिंग डाव्या बाजूला वळविता य