शेगाव- पंढरपूर रस्ता बांधकामाला निकृष्टतेचे ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 06:26 PM2018-09-28T18:26:43+5:302018-09-28T18:27:00+5:30

खामगाव :  शेगाव-खामगाव रस्ता बांधकामाला निकृष्टतेचे ग्रहण लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Shegaon - Pandharpur road construction low standard | शेगाव- पंढरपूर रस्ता बांधकामाला निकृष्टतेचे ग्रहण

शेगाव- पंढरपूर रस्ता बांधकामाला निकृष्टतेचे ग्रहण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

खामगाव :  शेगाव-खामगाव रस्ता बांधकामाला निकृष्टतेचे ग्रहण लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काँक्रीटीकरणाच्या सुमार दर्जामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यावरील ३०० पेक्षा जास्त मीटरचे रस्ता रद्द केला. त्यामुळे खळबळ उडाली असून, कंत्राटदाराने शुक्रवारपासून रद्द केलेला रस्ता खोदण्यास प्रारंभ केला आहे.

खामगाव-शेगाव मार्गाचे शेगाव ते पंढरपूर दरम्यान चौपदरीकरण करण्यात येत आहे. मात्र, गेल्या वर्षांपासून या रस्त्याचे काम संथगतीने सुरू आहे. दरम्यान, या रस्त्यांचे बांधकाम अतिशय सुमार दर्जाचे सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. सार्वजनिक बांधकाम विभागाने सुमार दर्जामुळे ३०० मीटरचा रस्ता रद्द केला. त्यामुळे संबधीत कंत्राटदाराने तयार केलेला रस्ता खोदण्यास प्रारंभ केला आहे.  रस्ता बांधकाम केल्यानंतर लगेचच या रस्त्यावरून वाहने गेलीत. त्यामुळे हा रस्ता उखडल्याचे ईगल इन्फ्रास्ट्रक्चरकडून आनंद बहिलाणी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. दरम्यान, रस्ताबांधकामाच्या संथगतीबाबत मात्र, त्यांनी चुप्पी साधली.

कंत्राटदाराची कानउघडणी!

खामगाव- शेगाव रस्त्याच्या निर्मितीसाठी ईगल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या अधिकाºयांची आणि कर्मचाºयांची चांगलीच कानउघडणी केली. त्यावेळी रस्ता खोदून पुन्हा रस्ता तयार करण्याची तयारी कंत्राटदाराकडून नॅशनल हायवे अ‍ॅथोरिटीला देण्यात आली. 

वाहतुकीची कोंडी: अनेकांचा बळी!

कंत्राटदाराने रस्त्याची एक बाजू पूर्ण न करताच, दुसरी बाजूही खोदून ठेवली आहे.  अनेकदा या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होत आहे. शिवाय रस्त्यावर धूळ उडते. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढीस लागले आहे. कंत्राटदाराच्या दुर्लक्षामुळे याठिकाणी अनेकांना आपला जीव गमवावा लागला.  मात्र, तरी देखील कंत्राटदारांकडून कोणत्याही प्रकारची खबरदारी घेण्यात आली नसतानाच, आता चक्क रस्ताच निकृष्ट दर्जाचा बांधण्यात आल्याचे उघडकीस आले.


गुणवत्ता नियंत्रण पथकाच्या पाहणीत रस्त्याचे काम निकृष्ट दर्जा आढळून आले. त्यामुळे हायवे अ‍ॅथोरिटी विभागाने पाहणी करून ३०० पेक्षा जास्त मीटरचा रस्ता रद्द केला आहे.

- रावसाहेब झाल्टे , कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण , अकोला.

Web Title: Shegaon - Pandharpur road construction low standard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.