शेगाव : दुचाकी अपघातात परभणीचा युवक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 00:57 IST2017-12-19T00:55:39+5:302017-12-19T00:57:03+5:30
शेगाव: शेगाव-खामगाव रस्त्यावरील कनारखेड फाट्यावर सकाळी ६.३0 वाजता परभणी जिल्ह्यातील युवकाला एका अज्ञात वाहनाने उडवले. त्यात जबर मार लागून युवकाचा घटनास्थळी मृत्यू झाला.

शेगाव : दुचाकी अपघातात परभणीचा युवक ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
शेगाव: शेगाव-खामगाव रस्त्यावरील कनारखेड फाट्यावर सकाळी ६.३0 वाजता परभणी जिल्ह्यातील युवकाला एका अज्ञात वाहनाने उडवले. त्यात जबर मार लागून युवकाचा घटनास्थळी मृत्यू झाला.
कनारखेड येथील पोलीस पाटील नीलेश गुलाबराव वाकोडे यांनी शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशन ला युवकाचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. त्यावरून पोलिसांनी युवकाच्या मोबाइलवरून कॉल केलेल्या नंबरवर फोन करून ओळख पटवून घेतली. हा युवक परभणी जिल्हय़ातील खंडाळा येथील असून त्याचे नाव तुकाराम पांडुरंग शिंदे (वय २६) असे निदर्शनास आले. हा युवक १७ डिसेंबररोजी शेगावला दर्शनासाठी आला होता असे त्याच्या वडीलांनी पोलिसांना सांगितले; मात्र त्याने रात्री ८ वाजताच मी शेगावला पोहचल्याचे सांगितले. त्यामुळे आम्ही निश्चित झालो असे त्याच्या वडीलांनी पोलिसांना सांगितले.
शेगावला कुणीही नातेवाईक नसून, तो कनारखेडजवळ कसा पोहचला याबाबत काहीही कल्पना त्याच्या वडीलांना नव्हती.
तुकारामचे पुढच्या वर्षी लग्न करायचे होते असेही ते म्हणाले. याप्रकरणी फिर्यादीवरून शेगाव ग्रामीण पोलिसांनी अप नं.0२८६/२0१७ कलम २७९,३0४ भादंवी नुसार दाखल केला आहे. पुढील तपास शेगाव पोलिस करीत आहेत.