शेगाव : सुटीतील गर्दीसाठी संत श्री गजान महाराजा संस्थानाने केले नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 12:22 AM2017-12-21T00:22:44+5:302017-12-21T00:29:22+5:30

शेगाव : संतनगरीत ख्रिसमस नाताळ सुट्यामध्ये आध्यात्मिक मनोहारी उद्यान आनंद सागर व ‘श्रीं’च्या समाधीच्या दर्शनासाठी भक्तांची मांदियाळी राहते. यास्तव श्री संस्थानच्यावतीने भक्तनिवास व दर्शनाची व्यवस्था केल्या गेली आहे.

Shegaon: The planning done by Saint Gajanan Maharaja Institute for the holidays | शेगाव : सुटीतील गर्दीसाठी संत श्री गजान महाराजा संस्थानाने केले नियोजन

शेगाव : सुटीतील गर्दीसाठी संत श्री गजान महाराजा संस्थानाने केले नियोजन

googlenewsNext
ठळक मुद्देतीन विपुल निवास व्यवस्थाभक्तांची गर्दी पाहून मंदिर रात्री खुले ठेवण्याबाबत निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्क
शेगाव : संतनगरीत ख्रिसमस नाताळ सुट्यामध्ये आध्यात्मिक मनोहारी उद्यान आनंद सागर व ‘श्रीं’च्या समाधीच्या दर्शनासाठी भक्तांची मांदियाळी राहते. यास्तव श्री संस्थानच्यावतीने भक्तनिवास व दर्शनाची व्यवस्था केल्या गेली आहे.
श्री गजानन महाराज संस्थानच्यावतीने तीन विपुल निवास व्यवस्था केल्या गेली आहे. यामध्ये श्री मंदिर परिसर संकुल, भक्तनिवास क्र.१ व २ तसेच भक्तनिवास संकुल परिसर भ.नि.क्र.३,४,५,६ आनंद विहार भक्तनिवास संकुल परिसर तसेच आनंद सागर विसावा, भक्तनिवास संकुल याव्यतिरिक्त संस्थेच्या आनंद सागर विसावा परिसरात पर्यायी निवास व्यवस्था उपलब्ध केल्या गेली आहे. २३ डिसेंबर ते २ जानेवारी २0१८ पर्यंत दर्शनार्थी भक्तांची गर्दी पाहून मंदिर रात्री खुले ठेवण्याबाबत निर्णय घेतल्या जाईल व संस्थांच्या सूचना फलकावर कळविण्यात येईल.
ख्रिसमस नाताळ या दिवसात सुट्या राहत असल्याने भक्तांची मांदियाळी ही संतनगरीत दाखल होत असते. यास्तव श्री संस्थानच्यावतीने श्री भक्तांसाठी सर्व सोयी-सुविधा अल्पदरात देण्यात येतात व संपूर्ण परिसर स्वच्छ व प्रसन्न वातावरण श्री सेवक आपल्या भक्तांच्या सोयीसाठी तत्पर राहतात.
आनंद सागरची ख्याती पश्‍चिम वर्‍हाडासोबतच सर्वदूर पोहोचली आहे. भक्ती, मनशांती आणि पर्यटनाचा आनंद मिळत असल्याने या ठिकाणी येणार्‍यांच्या संख्येत दरवर्षी भर पडत आहे. विदर्भातील प्रतिपंढरपूर म्हणून ‘श्रीं’च्या दर्शनासाठी भाविक येतात व आनंद सागरचीही सहल करतात. आनंद सागरचे प्रवेशद्वार राजस्थानी शैलीचे आठवण करून देणारे असून, आध्यात्मिक मनशांतीसाठी ध्यान मंडप, मत्स्यालय, झुलता पूल, खुला रंगमंच, संगीताच्या आधारावर, जलधारा, आनंद सागराची सैर करणारी रेल्वेगाडी आदी आनंद सागरची वैशिष्ट्ये आहेत. 

Web Title: Shegaon: The planning done by Saint Gajanan Maharaja Institute for the holidays

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.