शेगाव : प्रसूती झालेल्या महिलेचा रुग्णालयात मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 02:01 PM2019-07-30T14:01:01+5:302019-07-30T14:01:08+5:30
येथील सईबाई मोटे उपजिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान प्रसुती झालेल्या महिलेचा २९ जुलै रोजी पहाटे मृत्यू झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
येथील सईबाई मोटे उपजिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान प्रसुती झालेल्या महिलेचा २९ जुलै रोजी पहाटे मृत्यू झाला. डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे मृत्यू झाल्याचा आरोप करीत नातेवाईकांनी प्रेत उचलण्यास नकार दिला. त्यामुळे काही वेळ गोंधळ निर्माण झाला होता. वेळीच पोलिसांनी धाव घेतल्याने प्रकरण निवळले.
२२ जुलैरोजी बोदवड येथील पूजा लखन धांडे (वय २२) हिला प्रसूती करीता माहेरच्या लोकांनी रुग्णालयात दाखल केले. सिझेरियनद्वारे तिची प्रसूती २३ जुलैरोजी झाली. मात्र तिची प्रकृती खालावल्याने २९ जुलैरोजी पहाटे तिचा मृत्यू झाला. तिचा मृत्यू हा डॉकटरांच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. त्यामुळे प्रेत उचलण्यास नकार दिला. त्याठिकाणी तणाव निर्माण झाला. याबाबत तिचे पती लखन धांडे यांनी रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप केल्याने त्याठिकाणी पोलिसांना पाचारण करण्यात आले. तब्बल तिन ते चार तासांनी वैद्यकीय अधीक्षक अश्विनी मानकर यांनी त्यांची समजूत काढली. तेव्हा त्यांनी प्रेत नेण्यास होकार दिला व प्रकरण निवळले. रुग्णालय प्रशासनाद्वारे पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.