शेलगाव आटाेळ-डाेढरा रस्ता गेला खड्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:32 AM2021-08-29T04:32:56+5:302021-08-29T04:32:56+5:30
शेलगाव आटाेळ : गत काही दिवसांपासून शेलगाव आटाेळ ते डाेढरा रस्त्याची दुरवस्था झाली आहे़ माेठमाेठ्या खड्ड्यांमुळे या मार्गावरील वाहतूक ...
शेलगाव आटाेळ : गत काही दिवसांपासून शेलगाव आटाेळ ते डाेढरा रस्त्याची दुरवस्था झाली आहे़ माेठमाेठ्या खड्ड्यांमुळे या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे़ त्यामुळे, या परिसरातील ग्रामस्थांना माेठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे़ या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे़
शेलगाव आटोळ-चिखली- देऊळगाव राजा मार्गावरील पुलाला अनेक ठिकाणी माेठमाेठे खड्डे पडले आहेत़ त्यामुळे रोडवरील चारचाकी वाहनांची वाहतूक बंद झाली आहे.
परिसरातील गावांना देऊळगाव राजाकडे जाण्यासाठी सोईचा व जवळील मार्ग म्हणजे शेलगाव आटोळ ,डोढरा,देऊळगाव मही, हा आहे .या रस्त्याचे डांबरीकरण व पुलांचे काम गेल्या काही वर्षांत झालेले असून हा वर्दळीचा मार्ग आहे़ परंतु शेलगाव आटोळ ते डोढरा या रस्त्यावर असलेल्या पुलावर माेठमाेठे खड्डे पडले आहे़ या पुलावरील स्लॅबही उखडली आहे़ या रस्त्यावरील चारचाकी वाहतूक पूर्णतः बंद झाली आहे. त्यामुळे या परिसरातील प्रवासी वर्ग त्रस्त झाला आहे. हा रस्ता बंद झाल्याने वाहनधारकांना व प्रवाशांना इतर मार्ग वापरून देऊळगाव महिकडे जावे लागत आहे. या पुलाची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे़