शेगावच्या जिनींगला आग; बॉयलर जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2020 01:30 PM2020-01-25T13:30:44+5:302020-01-25T13:31:09+5:30

शेगाव शहरातील मध्यवस्तीत असलेल्या भट्टड जिनिंग अँड प्रेसिंगल शुक्रवारी दुपारी अचानक आग लागली.

Shengaon's Jining fire; Boiler burns | शेगावच्या जिनींगला आग; बॉयलर जळून खाक

शेगावच्या जिनींगला आग; बॉयलर जळून खाक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शेगाव : शहरातील बसस्थानक परिसरातील भट्टड जिनिंग अँड प्रोसेसिंग युनिटला शुक्रवारी दुपारी ३ वाजता आग लागल्याची घटना घडली. यामध्ये हजारो क्विंटलच्या रुई गठानी आणि कापूस जळून खाक झाला.
शेगाव शहरातील मध्यवस्तीत असलेल्या भट्टड जिनिंग अँड प्रेसिंगल शुक्रवारी दुपारी अचानक आग लागली. या आगीत जिनिंगमधील बॉयलर आणि यंत्रे जळून खाक झाली. या आगीवर वेळीच नियंत्रण मिळविल्याने बाजूलाच असलेल्या रुईच्या गठांनी आणि कापसाच्या गंजीला आग लागली नाही.
भट्टड यांच्या मालकीचे जिनिंग अँड प्रेसिंगचे केंद्र आहे. या केंद्रात हजारो क्विंटलच्या रुई गठानी आणि कापूस ठेवलेला आहे. यामध्ये आज दुपारी ३ वाजेच्या सुमारास केंद्रातील बॉयलर आणि मशीनमध्ये अचानकपणे आग लागली. इमारतींमधून धूर निघत असल्याचे लक्षात आल्यानंतर याबाबतची माहिती शेगाव नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला देण्यात आली. यानंतर काही वेळातच अग्निशमन दल केंद्रात पोहोचले. यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.
 

Web Title: Shengaon's Jining fire; Boiler burns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.