मेंढपाळांचा वन्यजीव विभागाच्या कर्मचा-यांवर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 01:53 AM2017-07-29T01:53:41+5:302017-07-29T01:54:16+5:30
ज्ञानगंगा अभयारण्याच्या प्रतिबंधित क्षेत्रात मेंढा चारणाºया मेंढपाळांना वन विभागाच्या कर्मचा-यांनी मनाई केली असता, मेंढपाळांनी त्यांच्यावर काठीने हल्ला केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: ज्ञानगंगा अभयारण्याच्या प्रतिबंधित क्षेत्रात मेंढा चारणाºया मेंढपाळांना वन विभागाच्या कर्मचाºयांनी मनाई केली असता, मेंढपाळांनी त्यांच्यावर काठीने हल्ला केला. यामध्ये तीन कर्मचारी जखमी झाले. ही घटना अभयारण्याच्या चिंचखेड बिटमध्ये गुरुवारी घडली. या प्रकरणी तीन मेंढपाळांना गुरुवारी रात्री अटक केली.
ज्ञानगंगा अभयारण्याच्या सुरक्षेसाठी मेळघाट येथून ‘विशेष टायगर प्रोटेक्शन फोर्स’(एसटीपीएफ) चे काही कर्मचाºयांना ज्ञानगंगा अभयारण्यात पाठवले आहे. एसटीपीएफचे कर्मचारी पूर्णवेळ अभयारण्यामध्ये गस्त घालतात. दरम्यान, २७ जुलै रोजी दुपारी १ वाजता खामगाव अंतर्गत येणाºया चिंचखेड बिट कंपार्टमेंट नं. २६९ मध्ये वन रक्षक संतोष रामकृष्ण शिंदे यांच्यासह एसटीपीएफ दलाचे सहा कर्मचारी गस्त घालीत असताना काही मेंढपाळ जवळपास ४०० मेंढ्या अभयारण्यात चारत असताना आढळून आले. मेंढपाळांना वनरक्षक शिंदे यांनी प्रतिबंधित क्षेत्रामध्ये मेंढ्या चारण्यासाठी अडवले. तेव्हा मेंढपाळांनी काठीने वन कर्मचाºयांवर हल्ला केला. यामध्ये वनरक्षक संतोष शिंदे यांच्यासह एसटीपीएफचे विलास दारशिंबे, सरिता दाशिंबे व चंदा भिलावेकर जखमी झाले.
सदर घटनेची माहिती मिळताच वन्य जीव विभागाचेअकोला व अमरावती येथील अधिकारी घटनास्थळी पोहचले. जखमींना खामगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, वनरक्षक संतोष रामकृष्ण शिंदे यांच्या तक्रारीवरून पिंपळगावराजा पोलीस स्टेशनला आरोपी मेंढपाळ चिमा रामा करंडे, सीताराम पिराजी बोरकर, कैलास त्र्यंबक शिंगाडे, श्याम चिमा कारडे, साहेबराव पिराजी बोरकर, गजानन उमा केसरकर, पुंडलिक सालीबा टाले तथा अन्य एका आरोपीविरुद्ध भादंवि १४३, १४७, १४८, १४९, ३५३, ३३२, ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. तसेच वन विभागाने आरोपींविरुद्ध वनसुरक्षा अधिनियम गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी गुरुवारी रात्री आरोपी चिमा कारंडे, सीताराम बोरकर व कैलास शिंगाडे या तीन जणांना अटक केली आहे.