शिर्ला प्रकल्पाचे पाणी खामगावकरांना मिळण्याची शक्यता धूसरच!​​​​​​​

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 02:51 PM2019-05-17T14:51:52+5:302019-05-17T14:52:00+5:30

‘दहा वर्षात शिर्ला डॅम प्रोजेक्ट होवू शकला नाही, आता दीड महिन्यात कसा होणार?’ असा प्रश्न खामगावकरांना पडला आहे.

Shinkla project water is available for Khamgaonkar! |  शिर्ला प्रकल्पाचे पाणी खामगावकरांना मिळण्याची शक्यता धूसरच!​​​​​​​

 शिर्ला प्रकल्पाचे पाणी खामगावकरांना मिळण्याची शक्यता धूसरच!​​​​​​​

googlenewsNext

- योगेश फरपट 
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: शहरवासियांना भिषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. यावर पर्याय म्हणून पालिका प्रशासनाने शिर्ला डॅमवरून पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. वास्तविकत: शिर्ला डॅम हा प्रोजेक्ट २००९ पासून सुरु आहे, मात्र तो पुर्णत्वास आणण्यात पालिका प्रशासनाला अपयश आले आहे. कंत्राटदार व पालिकेत समन्वयाचा अभाव असल्याने हा प्रकल्प होण्यास दिरंगाई होत आहे. अशात पुढील दीड महिन्यात प्रकल्प पुर्ण करून नागरिकांना पाणी देण्याचे दिवास्वप्न दाखवण्याचा प्रताप पालिकेच्या पदाधिकाऱ्यांकडून केला जात आहे. याबाबत शहरात आश्चर्य व्यक्त केले जात असून ‘दहा वर्षात शिर्ला डॅम प्रोजेक्ट होवू शकला नाही, आता दीड महिन्यात कसा होणार?’ असा प्रश्न खामगावकरांना पडला आहे.
सध्या खामगाव शहराला गेरू माटरगाव धरणावरून १५ ते २० दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. मात्र धरणातील जलसाठा संपुष्टात येत असल्याने पर्यायी व्यवस्था म्हणून शिर्ला डॅमवरून खामगावकरांसाठी पाणीपुरवठ्याचे नियोजन पालिकेमार्फत सुरु आहे. ३० एप्रिलपर्यंतच शिर्ला डॅमवरून पाणी पुरवठा सुरु होईल अशाप्रकारची वल्गना सत्ताधाऱ्यांनी केली होती. त्यानंतर नागरिकांचा रोष बघता ७ मेपासून पाणी नक्की मिळेल असे सांगण्यात आले. मात्र दोनदा दिलेल्या आश्वासनानंतर पाणीपुरवठा सुरु न झाल्याने पालिका प्रशासना तोंडघशी पडली आहे. कारण शिर्ला डॅमवरून पाणीपुरवठा करण्यासाठी कोणत्याही प्रकारची व्यवस्था नाही. मुळात पालिकेकडून नागरिकांची दिशाभूल केली जात असल्याचे वास्तव आहे. प्राप्त माहितीनुसार शिर्ला डॅम या प्रोजेक्टची सुरवात २००५ पासूनची आहे. तत्कालीन नगराध्यक्ष सुभाष देशपांडे यांनी दुरदृष्टी ठेवून २०२० पर्यंत शहराची लोकसंख्या विचारात घेवून या कायमस्वरुपी पाणी पुरवठा योजनेचा प्लान आखला होता. त्यानंतर सरस्वतीताई खासणे (२००६-२००९) सत्तेत आल्या. २००९ मध्ये अशोकसिंह सानंदा नगराध्यक्ष असतांना वर्क आॅर्डर मिळाली. २००९ ला प्रत्यक्ष काम सुरु झाले. अद्याप हे काम पुर्णत्वास येवू शकले नाही. त्यानंतर सरस्वतीताई खाचणे, गणेश माने, अशोक सानंदा नगराध्यक्ष राहिले. विद्यमान नगराध्यक्षा अनिताताई डवरे यांच्या कार्यकाळात पुन्हा या प्रोजेक्टचे काम हाती घेण्यात आले आहे. आमदार अ‍ॅड. आकाश फुंडकर हे स्वत: शिर्ला डॅमवर ठाण मांडून आहेत. पालिका प्रशासनाचे प्रामाणिक प्रयत्न असले तरी अनेक काम अद्याप प्रलंबीत असल्याने दीड महिन्यात खामगावकरांना पाणी मिळणे कठीण आहे.

Web Title: Shinkla project water is available for Khamgaonkar!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.