शिरपूर-लोणार बसफेरी सुरू हाेणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:20 AM2021-07-24T04:20:49+5:302021-07-24T04:20:49+5:30
ही फेरी शिरपूर येथून सकाळी ०८.०० वाजता निघून ती धरणगाव, चोपडा, जळगाव खान्देश) भुसावळ, मुक्ताईनगर, मलकापूर, बुलडाणा, चिखली, हिवरा ...
ही फेरी शिरपूर येथून सकाळी ०८.०० वाजता निघून ती धरणगाव, चोपडा, जळगाव खान्देश) भुसावळ, मुक्ताईनगर, मलकापूर, बुलडाणा, चिखली, हिवरा आश्रम, मेहकर, सुलतानपूरमार्गे सायंकाळी ०६.०० वाजता लोणार येथे मुक्कामी पोहोचेल. लोणार येथून ही फेरी शिरपूरकरिता सकाळी ०६.०० वाजता निघणार असून, ती शिरपूर येथे सायंकाळी ०५.०० वाजता पोहोचेल.
प्रवाशांना मिळणार दिलासा
विशेष म्हणजे लोणार येथून बुलडाणा, मलकापूर, जळगावकरिता ही पहिलीच फेरी असून या फेरीमुळे विद्यार्थी, प्रवासी, रुग्ण आणि व्यापारी यांची प्रवासाची अडचण दूर होईल. प्रवाशांच्या सेवेसाठी ही फेरी सुरू केल्याबद्दल राज्य परिवहन महामंडळाचे उपमहाव्यवस्थापक नियंत्रण समिती मुंबईचे माधव देवधर, धुळे विभागाच्या विभाग नियंत्रक, मनीषा सपकाळ आणि शिरपूर आगाराच्या आगार व्यवस्थापक, वर्षा पावरा यांचे प्रवासी सेवा संघटना, लोणार यांनी आभार व्यक्त केले़