शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी शिवसंग्रामचा रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 05:45 PM2018-05-29T17:45:13+5:302018-05-29T17:45:13+5:30
देऊळगाव राजा : शेतकऱ्यांचे तूर खरेदीचे चुकारे तात्काळ द्यावे यासह इतर मागण्यांसाठी शिवसंग्राम संघटनेच्या वतीने २९ मे रोजी येथील बस स्टॅण्ड चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
देऊळगाव राजा : शेतकऱ्यांचे तूर खरेदीचे चुकारे तात्काळ द्यावे यासह इतर मागण्यांसाठी शिवसंग्राम संघटनेच्या वतीने २९ मे रोजी येथील बस स्टॅण्ड चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांनी आंदोलनात सहभाग नोंदवला. राज्यात शासनाने शेतकऱ्यांच्या तुरीची नाफेड अंतर्गत हमी भावाने खरेदी केली आहे. तूर खरेदी करुन तीन ते चार महिने झाले. मात्र देऊळगाव राजा तालुक्यातील जवळपास दीडशे शेतकऱ्यांपैकी फक्त ७० ते ७५ शेतकऱ्यांनाच तुरीचे चुकारे शासनाकडून मिळाले. त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. शासनाने तत्काळ शेतकऱ्यांचे तुरीचे चुकारे द्यावे अशी मागणी करण्यात आली. शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकºयांना कर्ज माफी दिली. परंतु अनेक शेतकरी या योजनेच्या निकषात बसत नसल्यामुळे कर्ज माफीपासून वंचित आहेत. त्यामुळे कर्ज माफीच्या निकषात न बसलेल्या गरजु शेतकऱ्यांना तत्काळ पीककर्ज द्या, खतांचे वाढलेले दर कमी करा, खरीप हंगाम पेरणीपुर्वी कृषी केंद्रातील बोगस खत-बियाणांची गुणवत्ता अधिकाºयांमार्फत तपासणी करावी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, शेतकरी यांच्या यामध्ये समावेश असावा, इंधन दरवाढीवर मर्यादा घालून झालेली दरवाढ कमी करावी आदी मागण्यांसाठी शिवसंग्राम संघटनेच्या वतीने मंगळवारी देऊळगाव राजा येथे रास्ता रोको करण्यात आला. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना स्थानबध्द करुन नंतर सोडून दिले. या आंदोलनात शिवसंग्रामचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक जाधव, तालुका अध्यक्ष राजेश इंगळे, तालुका संघटक जाहिर खान पठाण, शंकर शिंदे, अनीस खान, युसूफ शाह, गोविंद टेके, निखिल पांडे, हारून शहा, नासेर मिर्झा, सोनू मिश्रा, मदन डुरे, शे.इब्राहिम यांच्यासह शिवसंग्रामचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच शेतकरी बांधव सहभागी झाले. ( तालुका प्रतिनिधी )