आदिवासी मुलींचे वसतिगृह सुरू करण्यासाठी शिवसेनेचे धरणे
By अनिल गवई | Published: September 2, 2022 06:45 PM2022-09-02T18:45:47+5:302022-09-02T18:47:43+5:30
सदर इमारत ताब्यात घेवून प्रवेश प्रक्रिया ताबड़तोब सुरु करून दलित, आदिवासी, अल्पसंख्यक मुलींना न्याय द्यावा, अन्यथा शिवसेना आपल्या स्टाइलने उत्तर देईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.
खामगाव: येथील शासकीय तंत्रनिकेतन कॉलेज येथे दलित,आदिवासी, अल्पसंख्याक मुलींसाठी बांधून तायर असलेले वसतिगृह सुरू करण्यासाठी शुक्रवारी शिवसेनेच्या वतीने सदर वसतिगृहासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
दलित, आदिवासी, अल्पसंख्यक मुलींसाठी शासकीय तंत्रनिकेतन खामगाव येथे वस्तिगृह बांधूंन पूर्ण झालेले आहे. गेल्या दोन वषेर्पासून सदर वस्तिगृह धूळखात असून मुलींना शिक्षणापासून, सुख-सोइपासुन वंचित ठेवण्याचा घाट अधिकारी वगार्ने घातला आहे. याविरुद्ध शिवसेना खामगाव तालुक्याच्या वतीने आवाज उठविण्यात येत असून आज सदर वसतिगृहा समोर एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले.
सदर इमारत ताब्यात घेवून प्रवेश प्रक्रिया ताबड़तोब सुरु करून दलित, आदिवासी, अल्पसंख्यक मुलींना न्याय द्यावा, अन्यथा शिवसेना आपल्या स्टाइलने उत्तर देईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे. यावेळी विधानसभा संघटक रवि महाले विधानसभा, तालुकाप्रमुख विजय बोदडे, शाहरप्रमुख विजय इंगळे, जेष्ठ नेते सुभाष ठाकुर, देवीदास उमाले, गजानन माने, प्रमोद कव्हड़े, आनंद चिंडाले, पंजाबराव पेसोड़े, नीलेश पारस्कर, प्रकाश खंडारे, गणेश सरोदे, प्रज्वल थोटांगे, ऋषिकेश राठोड,गणेश देशमुख, गैरव शेगोकार, हरीश सोलंक,प्रकाश पवार, नंदू भारसाकळे,ज्ञानेश्वर सोळंके,विजय तायड़े, यांची उपस्थिती होती.