शिवसेना व युवासेनेचे मोबाइल टॉवरवर 'शोले स्टाइल' आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 07:25 PM2021-07-10T19:25:01+5:302021-07-10T19:26:09+5:30

'Sholay Style' agitation on mobile tower :युवासेना तालुका प्रमुख नंदू कऱ्हाडे यांनी मोबाइल टॉवरवर चढून याकडे लक्ष वेधले.

Shiv Sena and Yuvasena's 'Sholay Style' agitation on mobile towers | शिवसेना व युवासेनेचे मोबाइल टॉवरवर 'शोले स्टाइल' आंदोलन

शिवसेना व युवासेनेचे मोबाइल टॉवरवर 'शोले स्टाइल' आंदोलन

Next

चिखली : गत काही दिवसांपासून तालुक्यातील नागरिकांना मोबाइल रेंजच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. या प्रकाराने ऑनलाइन शिक्षण, आरोग्य, शेती आदी सर्वच बाबींच्या सुविधा प्रभावित झाल्या आहेत. तथापि, कॉलड्रॉप होणे व नेटवर्क गायब होणे, या बाबी होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. याची दखल घेत शिवसेना व युवासेनेच्या वतीने १० जुलै रोजी आंदोलन करण्यात आले, तर युवासेना तालुका प्रमुख नंदू कऱ्हाडे यांनी मोबाइल टॉवरवर चढून याकडे लक्ष वेधले.

चिखली शहराला लागूनच असलेल्या खोर, माळशेंबा, अंत्री, वाघापूर, चांधई, गोद्री, पळसखेड दौलत, भोकर या गावांमध्ये मोबाइल रेंजची मोठी समस्या आहे. यामुळे ऑनलाइन शिक्षणात अडथळे येत असून, विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. सोबतच आजारपणात तत्काळ सेवा उपलब्ध करून देणाऱ्या १०८ नंबरवरदेखील सामान्य नागरिकांना फोन करता येत नाही. शेतीसह इतर सर्वच क्षेत्रांशी निगडित योजना या ऑनलाइन असल्याने त्यांचा लाभ घेण्यासही नागरिकांना त्रास होत आहे. या समस्यांचा पाढा नागरिकांनी शिवसेना संपर्क कार्यालयात मांडल्यानंतर नंदू कऱ्हाडे यांच्यासह प्रीतम गैची, पप्पू परिहार, आनंद गैची, प्रवीण सरदड, पंकज हाके, प्रदीप माळोदे यांनी पुढाकार घेत खोर येथील टॉवरवर चढून शोले स्टाइल आंदोलन केले. दरम्यान, शिवसेना पदाधिकाऱ्यांनीदेखील यामध्ये सहभाग घेत प्रशासनाचे लक्ष वेधले. यावेळी शिवसेना नेते प्रा. नरेंद्र खेडेकर, जिल्हा सहसंपर्क प्रमुख भास्करराव मोरे, उपजिल्हाप्रमुख शिवाजीराव देशमुख, तालुकाप्रमुख कपिल खेडेकर, शहरप्रमुख श्रीराम झोरे, युवासेना उपजिल्हाप्रमुख रोहित खेडेकर, विलास घोलप, समाधान जाधव, दत्ता देशमुख, मंगेश ठेंग, शेख बबलू, बंटी कपूर, साजीद, सरपंच दीपक पाटील, ज्ञानेश्वर वाघ, पो.पा. सुरेश पाटील, रमेश पाटील, अशोक मोहिते, अंकुश डहाके, राजू लोखंडे, दत्ता मैद, सोमनाथ तायडे, बंटी पांडे, वसंता साखरे, राजू बोरे, राजू कारले, जना पाटील, मदन कारले, बाळू कऱ्हाडे, प्रल्हाद कऱ्हाडे, प्रदीप माळोदे, योगेश डुकरे, गजानन पारवे, दीपक पांडे, प्रदीप वाघ, समाधान मोरे, अमोल मोरे, गोपाल डुकरे, पल्हाद राणा, संजय पवार यांच्यासह बहुसंख्य शेतकरी व विद्यार्थी उपस्थित होते.
आठ दिवसांत समस्या साेडविण्याचे आश्वासन

तहसीलदार येळे यांच्या मध्यस्तीने मोबाइल कंपनीचे प्रतिनिधी पांडे यांना धारेवर धरले असता आठ दिवसांच्या आत मोबाइल टाॅवरची फ्रिक्वेंसी वाढविण्यासह समस्यांचे निराकरण करण्यात येईल, असे आश्वासन संबंधितांनी दिले आहे.

Web Title: Shiv Sena and Yuvasena's 'Sholay Style' agitation on mobile towers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.