महाराष्ट्र बँक शाखा व्यवस्थापकास शिवसेनेचा घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:26 AM2021-06-04T04:26:43+5:302021-06-04T04:26:43+5:30
खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांची निकड लक्षात घेता तातडीने समस्या सोडविण्याची मागणी लावून धरली. गेल्या पाच दिवसांपासून बँक ऑफ महाराष्ट्रच्या ...
खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांची निकड लक्षात घेता तातडीने समस्या सोडविण्याची मागणी लावून धरली.
गेल्या पाच दिवसांपासून बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेतील व्यवहार लिंक फेलच्या समस्येमुळे प्रभावित झाले आहेत. परिणामी अनेक ग्राहक व शेतकऱ्यांना आपल्या व्यवहारासाठी बँकेच्या पायऱ्या झिजवाव्या लागत आहे. तरीही व्यवहार होत नसल्याच्या तक्रारी झाल्याने शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शाखा व्यवस्थापकाला घेराव घातला होता. सलग पाच दिवस शेतकऱ्यांचे व्यवहार होत नसल्याने रोष व्यक्त करीत बँकेच्या ढिसाळ कारभारामुळे अनेकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. तथापि स्वत:चेच पैसे वेळेवर मिळत नसल्याने मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यातच सध्या खरिपाची लगबग वाढली असल्याने बँकेने शेतकऱ्यांसाठी तत्परतेने सेवा पुरविण्याची गरज असल्याने बँकेने आपल्या कामात तातडीने सुसूत्रता आणून ग्राहक व शेतकऱ्यांना तत्पर सेवा पुरवावी, अशी मागणी यावेळी लावून धरण्यात आली. दरम्यान, बँकेने तातडीने व्यवहार सुरळीत न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी तालुकाप्रमुख खेडेकर, शहरप्रमुख श्रीराम झोरे, गजानन पवार, नगरसेवक दत्ता सुसर, प्रीतम गैची, रवी पेटकर, बंटी लोखंडे आदी उपस्थित होते.