शिवसेना जिल्हा प्रमुखांची पोलिसांसोबत ‘फ्री स्टाइल’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2017 12:50 AM2017-09-09T00:50:45+5:302017-09-09T00:50:50+5:30

राष्ट्रीय महामार्गावर नांदुरा शहरातील जुन्या बस स्टॅन्डजवळ शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता पाटील यांच्या वाहनाला ट्रकने धक्का दिला. त्यावरून दत्ता पाटील यांचा मुलगा व ट्रकचालक यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली. त्यांच्यातील वादामुळे मार्गावर वाहतूक विस्कळीत झाली होती. हा वाद सोडवण्यासाठी आलेल्या वाहतूक पोलिसांबरोबरही दत्ता पाटील व त्यांच्या मुलाचा वाद होऊन फ्री स्टाइल झाली. त्यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. यामध्ये दोन जण जखमी झाले असून, याप्रकरणी परस्पर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Shiv Sena district chief 'free style' with police! | शिवसेना जिल्हा प्रमुखांची पोलिसांसोबत ‘फ्री स्टाइल’!

शिवसेना जिल्हा प्रमुखांची पोलिसांसोबत ‘फ्री स्टाइल’!

Next
ठळक मुद्देगुन्हा दाखल वाहनाला ट्रकचा धक्का लागल्याने झाला वाद

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदुरा : राष्ट्रीय महामार्गावर नांदुरा शहरातील जुन्या बस स्टॅन्डजवळ शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता पाटील यांच्या वाहनाला ट्रकने धक्का दिला. त्यावरून दत्ता पाटील यांचा मुलगा व ट्रकचालक यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली. त्यांच्यातील वादामुळे मार्गावर वाहतूक विस्कळीत झाली होती. हा वाद सोडवण्यासाठी आलेल्या वाहतूक पोलिसांबरोबरही दत्ता पाटील व त्यांच्या मुलाचा वाद होऊन फ्री स्टाइल झाली. त्यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. यामध्ये दोन जण जखमी झाले असून, याप्रकरणी परस्पर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार शिवसेनेचे जिल्हा प्रमुख दत्ता पाटील हे आपल्या वाहनाने मुलासह नांदुर्‍याकडे येत होते. दरम्यान, राष्ट्रीय महामार्गावर जुन्या बस स्टॅन्डजवळ एका ट्रकने त्यांच्या वाहनाला धडक दिली. चालक दत्ता पाटील यांचे पुत्र शुभम पाटील यांचा ट्रकचालकासोबत वाद होत असताना वाहतूक खोळंबली. त्यावेळी वाहतूक पोलिसांनी घटनास्थळ गाठले व वाहतूक सुरळीत होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करीत असताना शुभम पाटील व दत्ता पाटील यांची पोलिसांसोबत शाब्दिक चकमक झाली. शाब्दिक चकमकीचे रूपांतर फ्री स्टाइलमध्ये झाल्याने पोलिसांनी लाठीचार्ज केला. ज्यामध्ये शुभम पाटील व पोलीस कर्मचारी पराग कोलते जखमी झाले. याप्रकरणी पोलिसांनी जिल्हा प्रमुख दत्ता पाटील, त्यांचा मुलगा शुभम पाटील, पवन पाटील व ड्रायव्हर, पीए यांच्यावर कलम ३५३, ३३२, २९४, ५0६, ३४ भादंवि अंतर्गत, तर ट्रकचालकाविरुद्ध कलम २७९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. 
-

Web Title: Shiv Sena district chief 'free style' with police!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.