शिवसेनेच्या वतीने पूरग्रस्तांना १४०० क्विंटल धान्य, किराणा रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:36 AM2021-07-30T04:36:12+5:302021-07-30T04:36:12+5:30

राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पूरग्रस्तांना मदत करा, असे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत ...

Shiv Sena sends 1400 quintals of food grains to flood victims | शिवसेनेच्या वतीने पूरग्रस्तांना १४०० क्विंटल धान्य, किराणा रवाना

शिवसेनेच्या वतीने पूरग्रस्तांना १४०० क्विंटल धान्य, किराणा रवाना

googlenewsNext

राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पूरग्रस्तांना मदत करा, असे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत खासदार प्रतापराव जाधव व शिवसेना आमदार, माजी आमदार, जिल्हाप्रमुख, सहसंपर्कप्रमुख, महिला आघाडी, उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, शहरप्रमुख व शिवसेना, युवा सेना पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातून एक हजार ४०० क्विंटल धान्य व किराणा (गहू, तांदूळ, पीठ, तेल, मीठ) जमा केले. गुरुवारी मेहकर येथून १३ बसेसमधून हे धान्य व किराणा पूरग्रस्तांना रवाना करण्यात आला. याप्रसंगी आमदार संजय रायमूलकर, आ. संजय गायकवाड, माजी आ. डॉ. शशिकांत खेडेकर, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवंत, सहसंपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर, कृषी सभापती राजेंद्र पळसकर, महिला आघाडी जिल्हाप्रमुख आशाताई झोरे, युवा सेना जिल्हा युवा अधिकारी ऋषी जाधव, किसान सेनेचे लखन गाडेकर, तालुकाप्रमुख शिवप्रसाद ठाकरे, बाळासाहेब नारखेडे, तालुकाप्रमुख सुरेश वाळूकर, उपनगराध्यक्ष तथा शहरप्रमुख जयचंद बाठीया, माजी उपजिल्हा प्रमुख दिलीपबापू देशमुख, अजय उमाळकर, नंदू कऱ्हाडे, उपतालुकाप्रमुख संजय पाटील, ओमसिंग राजपूत, युवा सेना तालुकाप्रमुख भूषण घोडे, भास्कर राऊत, दुर्गाप्रसाद रहाटे, कामगार सेनेचे संजय मापारी यांसह शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक हजर होते.

शिवसैनिकांचा प्रतिसाद

येथील जिजाऊ चौक ते धर्मवीर दिलीपराव रहाटे चौकापर्यंत सर्व शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक या बसेससोबत पायी गेले व तेथून १३ बसेस पुढे गेल्या. या बसेससोबत आमदार संजय रायमूलकर, आमदार संजय गायकवाड, माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, सहसंपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर सोबत गेले असून खासदार प्रतापराव जाधवही आजच चिपळूणला जाणार आहेत.

Web Title: Shiv Sena sends 1400 quintals of food grains to flood victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.