रब्बी पिकांसाठी कर्ज मिळवून देण्यासाठी शिवसेना प्रयत्न  करणार! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 12:52 AM2017-09-08T00:52:58+5:302017-09-08T00:53:18+5:30

शासनाने कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज  भरण्याची जी अट घातली आहे, त्यानुसार शिवसेनेचा  प्रत्येक कार्यकर्ता आणि पदाधिकार्‍याने समोर येऊन शे तकर्‍यांना अर्ज भरण्यासाठी मदत करावी, असे  आवाहन शिवसेनेचे विदर्भ संपर्क प्रमुख तथा राज्याचे  परिवहनमंत्री ना. दिवाकर रावते यांनी केले. शेतकर्‍यांना  रब्बी पिकाच्या पेरणीपूर्वी बँकांकडून कर्ज वाटप व्हावे,  यासाठी शिवसेना प्रयत्न करणार असल्याचे प्रति पादनसुद्धा रावते यांनी केले.

Shiv Sena will try to get loan for rabi crops! | रब्बी पिकांसाठी कर्ज मिळवून देण्यासाठी शिवसेना प्रयत्न  करणार! 

रब्बी पिकांसाठी कर्ज मिळवून देण्यासाठी शिवसेना प्रयत्न  करणार! 

Next
ठळक मुद्देदिवाकर रावते यांचे प्रतिपादनकर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी मदत करण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क 
शेगाव : शासनाने कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज  भरण्याची जी अट घातली आहे, त्यानुसार शिवसेनेचा  प्रत्येक कार्यकर्ता आणि पदाधिकार्‍याने समोर येऊन शे तकर्‍यांना अर्ज भरण्यासाठी मदत करावी, असे  आवाहन शिवसेनेचे विदर्भ संपर्क प्रमुख तथा राज्याचे  परिवहनमंत्री ना. दिवाकर रावते यांनी केले. शेतकर्‍यांना  रब्बी पिकाच्या पेरणीपूर्वी बँकांकडून कर्ज वाटप व्हावे,  यासाठी शिवसेना प्रयत्न करणार असल्याचे प्रति पादनसुद्धा रावते यांनी केले.
गुरुवारी शेगावात बुलडाणा जिल्हय़ातील आजी-माजी  कार्यकर्ता आणि पदाधिकार्‍यांची बैठक आयोजित  करण्यात आली होती. या बैठकीत मार्गदर्शन करताना ते  बोलत होते. यावेळी खासदार जाधव यांनी शिवसेना आ ता शेतकर्‍यांसाठी रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा  दिला. यावेळी मंचावर खा.प्रतापराव जाधव, आ. श्रीकां त देशपांडे, माजी आमदार विजयराज शिंदे, शिवसेना  जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, माजी आमदार गावंडे,  संजय गायकवाड, दत्ता पाटील आदींची उपस्थिती होती.  रावते पुढे म्हणाले, की पक्षप्रमुखांनी विदर्भातील  शिवसेना आणखी मजबूत करण्याची जबाबदारी आ पल्याला दिली आहे. त्यानुसार आता आपल्यात आलेली  मरगळ दूर करून कामाला लागण्याची गरज आहे.  महाराष्ट्रात शिवेनेकडे एक हाती सत्ता येण्यासाठी सर्वांनी  प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.  
नवरात्रीची पहिली माळ सुरू होण्यापूर्वी आलेल्या अर्जा तील पात्र शेतकर्‍यांची तातडीने कर्जमुक्ती करावी, ही  भूमिका उद्धव ठाकरेंनी जाहीर केली आहे. त्यासाठी  आमचे शिवसैनिक आता बँकांमध्ये जाऊन  कर्जमाफीचा आग्रह धरणार आहेत, असेही ते म्हणाले. 
या बैठकीत जिल्ह्यातील बहुतांश शिवसैनिकांची उपस् िथती होती. 

Web Title: Shiv Sena will try to get loan for rabi crops!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.