शिवसेनेचे माजी शहरप्रमुख शिंदे फरार!

By admin | Published: August 20, 2016 02:25 AM2016-08-20T02:25:11+5:302016-08-20T02:25:11+5:30

रेल्वे पोलिसात दाखल आहे गुन्हा; तपास कामात प्रतिसाद नाही.

Shiv Sena's former city chief Shinde absconded! | शिवसेनेचे माजी शहरप्रमुख शिंदे फरार!

शिवसेनेचे माजी शहरप्रमुख शिंदे फरार!

Next

शेगाव,(जि. बुलडाणा), दि. १९ : रेल्वेच्या भुसावळ विभागाच्या सल्लागार समितीचे सदस्य तथा शेगाव शहर शिवसेनेचे माजी शहरप्रमुख दिनेश शिंदे हे रेल्वे पोलिसांच्या रेकॉर्डनुसार सध्या फरार आहेत. तीन महिन्यांपूर्वी त्यांच्याविरुद्ध रेल्वे पोलिसांत सरकारी कामात अडथळा व रेल्वे स्थानकावर दादागिरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.दिनेश लक्ष्मण शिंदे रा. व्यंकटेशनगर शेगाव हे येथील रेल्वे स्थानकावरील रेल्वे प्रोटेक्शन फोर्सच्या कार्यालयात ९ मे २0१६ रोजी पोहचून स्वत:चा परिचय न देता कार्यालयातील खुर्ची ओढून त्यावर बसले व दादागिरी केली. शिवाय शासकीय कामात अडथळा निर्माण केला, असा त्यांच्यावर आरोप आहे. याप्रकरणी अपराध क्रं.१५३८/२0१६ कलम १४५ (ब) रेल्वे अँक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेला तीन महिन्यांचा कालावधी उलटलेला असताना शिंदे यांना रेल्वे सुरक्षा बलाकडून तपासात मदत करणेकामी तीनवेळा पत्रव्यव्हार केलेला असतानाही त्यांनी रेल्वे पोलिसांना मदत केलेली नाही, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक सुनील डोंगरे यांनी दिली आहे.

शिंदेंची भूमिका ह्यतो मी नव्हेचह्ण!
रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर दिनेश शिंदे यांना रेल्वे पोलीस विभागाने नोटीस बजावून पोलीस स्टेशनात हजर राहण्याचे सांगितले होते. यावरून दिनेश शिंदे हे आपल्या वकिलांसोबत ६ जुलै २0१६ रोजी पोहचून ह्यतो मी नव्हेचह्णअशी भूमिका घेत, तुमच्या पोलीस दप्तरातील दिनेश लक्ष्मण शिंदे आपण नसून, मी दिवाकर लक्ष्मण शिंदे असल्याची बाजू मांडली आहे. यावरून पोलिसांनी वृत्तपत्रातील कात्रणे, जाहिरात फलकांवरील मजकुर गोळा करण्याचे काम सुरू केले असून, शिंदे यांची बनवाबनवी पोलिसांच्या लक्षात आली असल्याचे ठाणेदार सुनील डोंगरे यांनी सांगितले आहे.

रेल्वे पोलिसांकडे दाखल असलेल्या गुन्ह्याशी माझा कुठलाही संबंध नाही. याबाबत मी पडताळणी केली आहे. रेल्वे पोलीस माझ्याविरूध्द हेतुपुरस्सरपणे कारवाई करत असतील तर ते चुकीचे आहे.
- दिनेश शिंदे, विभागीय रेल्वे सल्लागार समिती सदस्य, शेगाव

Web Title: Shiv Sena's former city chief Shinde absconded!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.