सोयगाववर शिवसेनेचा भगवा कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:36 AM2021-02-11T04:36:20+5:302021-02-11T04:36:20+5:30
बुलडाणा : विकासाच्या दृष्टीने आदर्श मॉडेल म्हणून समोर आलेले शिवसेना जिल्हा प्रमुख जालिंधर बुधवत यांच्या सोयगाव या ...
बुलडाणा : विकासाच्या दृष्टीने आदर्श मॉडेल म्हणून समोर आलेले शिवसेना जिल्हा प्रमुख जालिंधर बुधवत यांच्या सोयगाव या गावावर शिवसेनेचा भगवा कायम राहिला असून, सरपंचपदी सरला शिवानंद मांटे तर उपसरपंचपदी वैशाली श्रीराम पिंपळे यांची अविराेध निवड करण्यात आली. सोयगाव-पांगरखेड गट ग्रामपंचायतमध्ये ९ सदस्य आहेत. शांततेत निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर ९ फेब्रुवारी रोजी सरपंचपदाकरिता शासनाकडून निवडणूक घोषित झाली होती. शिवसेनेचा भगवा सोयगाववर कायम राहिला असून, सरपंचपदी सरला शिवानंद मांटे व उपसरपंच वैशाली श्रीराम पिंपळे यांची बिनविरोध निवड झाली. ग्राम संसद कार्यालयासमोर शिवसेना जिल्हा प्रमुख जालिंधर बुधवत यांनी नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच, सदस्यांचा सत्कार केला. विकासात्मक वाटचालीसाठी सहकार्य कायम राहील, अशी ग्वाही याप्रसंगी जालिंधर बुधवत यांनी दिली. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख लखन गाडेकर, माजी पं.स.सभापती सुधाकर आघाव यांच्यासह नवनिर्वाचित सदस्य व ग्रामस्थांची उपस्थिती होती, अशी माहिती सरपंचपती शिवानंद मांटे यांनी दिली.(वा.प्र.)