शिवप्रतिष्ठानचा बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला सन्मान मोर्चा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 01:04 AM2018-03-29T01:04:00+5:302018-03-29T01:04:00+5:30

बुलडाणा : संभाजी भिडे गुरुजी यांच्यावरील अ‍ॅट्रॉसिटी व दंगलीचे गुन्हे मागे घेण्यासह अन्य मागण्यांसाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने २८ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर सन्मान मोर्चा काढण्यात आला. दुपारी १२ वाजता संगम चौकातून हा मोर्चा निघाला. जयस्तंभ चौक मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. शिष्टमंडळाच्यावतीने  अपर जिल्हाधिकाºयांशी  चर्चा करून मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. 

shivpratishthan's agitation on buldana district collector's office, Samman Front! | शिवप्रतिष्ठानचा बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला सन्मान मोर्चा!

शिवप्रतिष्ठानचा बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला सन्मान मोर्चा!

Next
ठळक मुद्देसंभाजी भिडे गुरुजी यांच्यावरील अ‍ॅट्रॉसिटी व दंगलीचे गुन्हे मागे घेण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : संभाजी भिडे गुरुजी यांच्यावरील अ‍ॅट्रॉसिटी व दंगलीचे गुन्हे मागे घेण्यासह अन्य मागण्यांसाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने २८ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर सन्मान मोर्चा काढण्यात आला. दुपारी १२ वाजता संगम चौकातून हा मोर्चा निघाला. जयस्तंभ चौक मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. शिष्टमंडळाच्यावतीने  अपर जिल्हाधिकाºयांशी  चर्चा करून मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. 
भिडे गुरुजींवरील गुन्हे तत्काळ मागे घ्यावे तसेच मिलिंद एकबोटे, धनंजय देसाई, वीरेंद्र तावडे यांची त्वरित मुक्तता करावी, गोविंद महाराज समाधीजवळ वादग्रस्त फलक कुणी लावला, याबाबत चौकशी करून संबंधितांना अटक करा, पुणे येथील एल्गार परिषदेत भडकावू भाषणे करणाºया जिग्गेश मेवाणी, उमर खालीद, अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर, माजी न्यायमूर्ती कोळसे पाटील, सुधीर ढवळे, संतोष शिंदे, ज्योती जगताप, हर्षाली पोतदार, मौलाना अझरनी यांना दंगलीसाठी जबाबदार धरून चौकशी करून अटक करावी, राहुल फटांगडेच्या मारेकºयांवर खुनाचा गुन्हा दाखल करून कारवाई करा, भिडे गुरुजींच्या नावाने फिर्याद देणाºया महिलेची चौकशी करावी, यासह इतर मागण्या यावेळी करण्यात आल्या. 
 मोर्चात   मोठ्या संख्येने युवकांनी  सहभाग नोंदवला. या मोर्चाला अखिल भारतीय कैकाडी महासंघ, आदिवासी वाल्मीकलव्य संघटना, एकलव्य ब्रिगेड भिल्ल समाज संघटना, मेहतर वाल्मीकी समाज संघटना, अखिल भारतीय भोई समाज, अखिल भारतीय धनगर समाज संघर्ष समिती, जय भगवान महासंघ, अखिल भारतीय हिंदू खाटीक संघटना, राष्ट्रीय गुरव समाज महासंघ, जीवा सेना, शिंपी समाज बुलडाणा, आॅल इंडिया सोनार फेडरेशन, अखिल भारतीय ब्राम्हण महासंघ, बंजारा सेवा संघ, अखिल भारतीय क्षेत्रीय महासंघ, अंतर्गत महाराणा सेवा समिती, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, धर्मवीर आखाडा, टायगर ग्रुप, दयावान संघटना, रुद्र ग्रुप, मातोश्री ग्रुप, जय भवानी मंडळ, शिव सूर्य मित्र मंडळ, राजमाता मित्र मंडळ, कोंढाना मित्र मंडळ, जुनागाव मित्र मंडळ, गौर सेना बुलडाणा, गुरुद्वार गुरुनानक दरबार साहेब बुलडाणा, मी वडार महाराष्ट्राचा बुलडाणा, हिंदुराज प्रतिष्ठान अमडापूर, हिंदू राष्ट्रसेना मलकापूर, विश्व हिंदू महासंघ मलकापूर, शिव युवा प्रतिष्ठान मलकापूर, सुरेश कुमार शर्मा म. प्र. काँ. सेवादल मलकापूर, रुद्र बहूद्देशीय समिती बुलडाणा, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद , ब्राम्हण जागृती सेवा संघ,  संत गाडगे महाराज सेवा मंडळ, महाराष्ट्र नरहरी सेना चिखली, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना चिखली, स्वराज्य क्रांती युवा संघटना चिखली, नाभिक समाज जीवा-शिवा-युवा बहूद्देशीय चिखली, महाराष्ट्र नवनिर्माण सेना बुलडाणा, वंदे मातरम् मित्र मंडळ कोºहाळा बाजार अशा विविध समाज संघटनांनी पाठिंबा दिल्याची माहिती शिवप्रतिष्ठानच्या पदाधिकाºयांनी दिली.
 

Web Title: shivpratishthan's agitation on buldana district collector's office, Samman Front!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.