मलकापूर पाग्रां येथील सराफा दुकान फोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 00:59 IST2017-12-18T00:58:48+5:302017-12-18T00:59:40+5:30
मलकापूर पांग्रा: मलकापूर पाग्रां येथील रत्नपारखी ज्वेलर्स येथे चोरी करून नगद व सोन्या, चांदीचे दागिने असा एकूण दोन लाख ४५ हजारांचा ऐजव लपास केल्याची घटना १७ रोजी रात्री घडली.

मलकापूर पाग्रां येथील सराफा दुकान फोडले
लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर पांग्रा: मलकापूर पाग्रां येथील रत्नपारखी ज्वेलर्स येथे चोरी करून नगद व सोन्या, चांदीचे दागिने असा एकूण दोन लाख ४५ हजारांचा ऐजव लपास केल्याची घटना १७ रोजी रात्री घडली. मलकापूर पांग्रा गावातील बस्थानकावरून बाजारात जाणार्या मुख्य गल्लीत रत्नपारखी ज्वेलर्स अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून दुकानात प्रवेश केला व गल्ल्यातील रोख रक्कम व दागिने असा २ लाख ४५ हजारांचे दागिने लंपास केले. यावेळी जवळच राहणार्या शेजार्यांनी आवाज आल्यावर त्यांनी आपले दार उघडण्याचा प्रयत्न केला; मात्र चोरांनी आजूबाजूला राहणार्यांच्या दरवाज्याच्या कड्या बाहेरून लावून घेतल्या होत्या. त्यांनी आरडाओरड करण्याआधी चोरट्यांनी तेथून पळ काढला.