खामगावात फेरीवाला सर्वेक्षणाला अल्प प्रतिसाद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 03:38 PM2020-02-28T15:38:48+5:302020-02-28T15:38:54+5:30
फेरीवाला सर्वेक्षणबाबत खामगाव शहरात फेरीवाल्यामध्ये कमालीची उदासीनता दिसून येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: नगर पालिका क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांच्या सर्वेक्षणास प्रशासनाने सुरुवात केली आहे. मात्र, खामगावातील फेरीवाल्यांकडून या सर्वेक्षणाला अपेक्षित सहकार्य मिळत नसल्यामुळे शुक्रवारी पालिका कर्मचारी व अधिकाऱ्यांनी सर्वेक्षण न करणाऱ्या फेरीवाल्यांना सूचना दिल्या.
फेरीवाला सर्वेक्षणबाबत खामगाव शहरात फेरीवाल्यामध्ये कमालीची उदासीनता दिसून येत आहे. सर्वेक्षणाला सुरूवात झाल्यापासून केवळ 57 फेरीवाल्यांनीच नोंदणी केली आहे. वारंवार सूचना देऊन, जनजागृती करूनही अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याने शुक्रवारी मुख्यधिकारी धनंजय बोरीकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहर अभियान व्यवस्थापक राजेश झनके, ,सहायक प्रकल्प अधिकारी निलेश पारस्कर, फेरीवाला सर्वेक्षण करणाऱ्या यंत्रणेचे राम माजगावकर, सागर शेळके, विजय पवार, शैलेश पवार,
यांनी प्रत्यक्ष शहरातील फेरीवाला यांच्या भेटी घेऊन, सर्वेक्षणमध्ये सहकार्य करण्याचा सूचना दिल्या.