रॅपिड टेस्ट किटचा तुटवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:31 AM2021-04-19T04:31:21+5:302021-04-19T04:31:21+5:30
बुलडाणा : कोरोना संसर्गाचे निदान करणाऱ्या रॅपिड टेस्ट किटचा जिल्ह्यात तुटवडा निर्माण झाला आहे. बुलडाणा शहरातील दोन कोविड तपासणी ...
बुलडाणा : कोरोना संसर्गाचे निदान करणाऱ्या रॅपिड टेस्ट किटचा जिल्ह्यात तुटवडा निर्माण झाला आहे. बुलडाणा शहरातील दोन कोविड तपासणी केंद्रावर सध्या याचा साठा उपलब्ध नसल्याची माहिती समोर आली आहे. आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल येण्यास दोन ते तीन दिवस लागत असल्याने संदिग्धांकडून रॅपिड टेस्ट करण्याची मागणी होते. रॅपिड टेस्टमध्ये रुग्ण निगेटिव्ह आल्यास त्याची मग आरटीपीसीआर टेस्ट केली जाते. रॅपिड टेस्टमध्ये लगेच रिझल्ट कळत असल्याने अनेक जण रॅपिड टेस्ट करण्याची मागणी करत आहेत. मात्र बुलडाणा शहरातील अपंग विद्यालयातील कोविड केअर सेंटर आणि सक्युर्लर रोडवरील मुलींच्या शासकीय वसतिगृहातील कोविड केअर सेंटरमध्ये रॅपिड टेस्टच्या किट उपलब्ध नसल्याचे समोर आले. जिल्ह्यातही अन्य काही केंद्रावर अशी स्थिती असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे आरटीपीसीआर लॅबवर सध्या ताण आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या सुमारे साडेतीन लाखांपेक्षा अधिक नागरिकांच्या चाचण्यांपैकी ४८ टक्के चाचण्या या आरटीपीसीआरद्वारे करण्यात आल्या तर ४९ टक्के चाचण्या या रॅपिड टेस्टद्वारे करण्यात आल्या आहेत. ट्रुनॅटद्वारे अवघ्या ३ टक्के चाचण्या आजपर्यंत झालेल्या आहेत.