भूसंपादनाच्या कामाचा डोलारा सेवानिवृत्तांच्या खांद्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 05:54 PM2018-07-19T17:54:56+5:302018-07-19T17:54:58+5:30

कामातील अनुभवाचे फलीत : जिगाव प्रकल्पावरील कामांसाठी दहा कर्मचारी

On the shoulders of land retirements | भूसंपादनाच्या कामाचा डोलारा सेवानिवृत्तांच्या खांद्यावर

भूसंपादनाच्या कामाचा डोलारा सेवानिवृत्तांच्या खांद्यावर

Next

ब्रम्हानंद जाधव
बुलडाणा : भूसंपादन अधिका-यांच्या अधिपत्याखाली चालणा-या भूसंपादन कामाचा डोलारा सेवानिवृत्त कर्मचा-यांच्या खांद्यावर सोपविण्यात येत आहे. राष्ट्रीय महामार्ग, खडकपूर्णा प्रकल्पांतर्गत आणि विविध ठिकाणच्या सिंचन प्रकल्पांतर्गत भूसंपादनाची कामे करण्यासाठी कंत्राटी पद्धतीने सेवानिवृत्त कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात येते. तर जिगाव प्रकल्पावरील कामांसाठी दहा सेवानिवृत्तीवरील कर्मचारी कार्यरत असून त्यांच्या कामाचा अनुभव भूसंपादनासाठी फायद्याचा ठरत  आहे.

राष्ट्रीय महामार्ग, विविध सिंचन प्रकल्पांची कामे सध्या अनेक ठिकाणी सुरू असून त्यासाठी महत्त्वाचे काम म्हणजे भूसंपादन प्रक्रिया आहे.
भूसंपादनाची प्रक्रिया जर लकवर झाली नाही, तर सर्व नियोजीत कामे खोळंबतात. त्यामुळे भूसंपादनाच्या कामांवर अनुभवी कर्मचारी असतील तर भूसंपादन लवकरात लवकर होऊन त्याठिकाणी कामाला प्रारंभ करता येतो. त्यासाठी भूसंपादन अधिका-यांच्या अधिपत्याखाली चालणा-या राष्ट्रीय महामार्ग, सिंचन प्रकल्पांसाठी भूसंपादनांची कामे करण्यासाठी सेवानिवृत्त कर्मचारी कंत्राटी पद्धतीने घेण्यात येत आहेत. भूसंपादनाच्या कामावर महसूल विभागातील सेवानिवृत्त कर्मचा-यांच्या नियुक्त्या करण्यात येतात.

त्यामध्ये नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, अव्वल कारकून अशा सेवानिवृत्त कर्मचा-यांचा  समावेश आहे. या सेवानिृत्त कर्मचाºयांना भूसंपादन, पुनर्वसन करताना वाजवी भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनिमानुसार व जिल्हाधिकाºयांच्या आदेशानुसार ६० दिवसांच्या आत कास्तकारांचे आक्षेप बोलविणे, प्राप्त झालेल्या आक्षेपानुसार संबंधित कास्तकारांना नोटीस देणे, त्यानंतर भूसंपादन प्रकरणात जमिनीच्या निगडीत असलेल्या सर्व बाबींचे मुल्यांकन प्राप्त करून घेणे, भुसंपादनात प्रारूप व अंतिम निवाडा तयार करून मंजूरी प्रदान झाल्यानंतर संबंधित कास्तकारांना त्यांच्या संपादित जमिनीचा त्यांच्या तहसिल कार्यालयाच्या ठिकाणी मोहीम राबवून मोबदला व भुसंपादन प्रमाणपत्र देण्याचे कार्य   करावे लागते. याचप्रमाणे जिगाव प्रकल्पावरील भूसंपादन प्रकरणातील कामे निकाली
काढण्यासाठी दहा सेवानिवृत्त कर्मचारी बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयातील भूसंपादन विभागात कार्यरत आहेत. या सेवानिवृत्तीवरील कर्मचा-यांकडून सध्या भूसंपादनाची कामे सुरू आहेत. जिगाव प्रकल्पाची व्याप्ती मोठी असल्याने बुलडाणा, मलकापूर सह अन्य एका ठिकाणी अशा तीन  ठिकाणी ही कामे व्यापलेली आहेत.


या कर्मचा-यांचा आहे समावेश
जिगाव प्रकल्पावरील भूसंपादन प्रकरणे निकाली काढण्यासाठी एकूण दहा सेवानिवृत्ती कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामध्ये नायब तहसीलदार एक, वरिष्ठ लिपीक तीन, सेर्वेअर दोन, मंडळ अधिकारी दोन, शिपाई दोन या दहा कर्मचा-या-यांचा समावेश आहे.

 खडकपूर्णा प्रकल्पांतर्गत भूसंपादन कामासाठी पाच उमेदवार बुलडाणा उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकाºयांच्या अधिपत्याखाली चालणा-या राष्ट्रीय महामार्ग व खडकपूर्णा प्रकल्पांतर्ग भूसंपादनाच्ये प्रकरणे निकाली काढण्यासाठी कंत्राटी पद्धतीने सेवानिवृत्त कर्मचा-यांना अर्ज मागविण्यात आले होते. महासूल विभागातील पाच कर्मचा-यांचे अर्ज भूसंपादन विभागाकडे आले आहेत. त्यामध्ये मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार दोन, अव्वल कारकून या पाच सेवानिवृत्त कर्मचा-यांचा समावेश आहे.

Web Title: On the shoulders of land retirements

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.