श्रींच्या पंढरपूर वारीची जय्यत तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2017 12:25 AM2017-05-18T00:25:50+5:302017-05-18T00:25:50+5:30

श्री गजानन महाराज आपल्या भक्त वारकऱ्यांसमवेत श्रीक्षेत्र पंढरपूर पायदळ वारीकरिता भजनी दिंडी, गज व अश्वासह ३१ मे २०१७ बुधवार रोजी सकाळी ७ वाजता प्रस्थान होत आहे

Shree Pandharpur Wari's Birthday Preparation | श्रींच्या पंढरपूर वारीची जय्यत तयारी

श्रींच्या पंढरपूर वारीची जय्यत तयारी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शेगाव : विदर्भाचा राजा सद्गुरु श्री गजानन महाराज आपल्या भक्त वारकऱ्यांसमवेत श्रीक्षेत्र पंढरपूर पायदळ वारीकरिता भजनी दिंडी, गज व अश्वासह ज्येष्ठ शु.६ ३१ मे २०१७ बुधवार रोजी सकाळी ७ वाजता मंगलमय वातावरणात प्रस्थान होत आहे.

श्रींच्या पालखीचा मार्ग पुढील प्रमाणे : ३१ मे बुधवार श्रीक्षेत्र नागझरी, रात्री पारस, १ जून गायगाव भौरद, २ जून शुक्रवार अकोला-अकोला, ३ जून शनिवार अकोला-अकोला, ४ जून शनिवार भरतपूर वाडेगाव, ५ जून सोमवार देऊळगाव पातूर, ६ जून मंगळवार मेडशी - श्रीक्षेत्र डव्हा, ७ जून बुधवार मालेगाव- शिरपूर जैन, ८ जून गुरुवार चिंचाबाबेन-मृसला पेन, ९ जून शुक्रवार किनखेडा-रिसोड, १० जून शनिवार पानकन्हेरगाव-सेनगाव, ११ जून रविवार श्रीक्षेत्र नरसी (नामदेव) यदिग्रस, १२ सोमवार श्रीक्षेत्र औढानागनाथ- जवळा बाजार, १३ मुंगळवार हट्टा अडगाव रंगोबा, श्रीक्षेत्र त्रिधारा, १४ बुधवार परभणी-परभणी, १५ जून गुरुवार ब्राह्मणगाव-दैढणा, १६ जून शुक्रवार खळी-गंगाखेड, १७ जून शनिवार वडगाव (दादा हरि)- परळी थर्मल, १८ जून रविवार परळी- परळी वैजनाथ, १९ जून सोमवार कन्हेरवाडी- अंबाजोगाई, २० जून मंगळवार लोखंडी-सावरगाव बोरी सावरगाव, २१ जून बुधवार गोटेगाव-कळंब, २२ जून गुरुवार - गोविंदपूर-तेरणा साखर कारखाना, २३ जून शुक्रवार किनी-उपळा माकडाचे, २४ जून शनिवार श्री संत ज्ञानेश्वर म. मंदिर उस्मानाबाद - उस्मानाबाद, २५ जून रविवार वडगाव सिद्धेश्वर, श्रीक्षेत्र तुळजापूर, २६ जून सोमवार सांगवी उळे, २७ जून मंगळवार सोलापूर-सोलापूर, २८ जून बुधवार सोलापूर- सोलापूर, २९ जून गुरुवार सोलापूर-तिऱ्हे, ३० जून शुक्रवार कामती खु. वाघोली, माचणपूर, १ जुलै शनिवार ब्रह्मपुरी- श्रीक्षेत्र मंगलवेला, २ जुलै श्रीक्षेत्र मंगलवेढा- श्रीक्षेत्र पंढरपूर दिनांक २ जुलै १७ ते ८ जुलै १७ सहा दिवस श्रींचे पालखीचा मुक्काम श्री क्षेत्र पंढरपूर येथेच राहत आहे. श्रींच्या पालखीचे पायदळ वारीचे हे ५० वे वर्षे आहे.

Web Title: Shree Pandharpur Wari's Birthday Preparation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.