श्रींच्या पुण्यतिथी उत्सवाची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 12:41 AM2017-08-28T00:41:38+5:302017-08-28T00:42:15+5:30

शेगाव: श्रींच्या पुण्यतिथी उत्सवाची सांगता रविवारी श्रीधर बुवा आवारे यांचे काल्याचे कीर्तन होऊन दहीहंडी पूजन व गोपालकाल्याने हजारो भक्तांच्या उपस्थित करण्यात आली. ‘कृष्ण गोकुळी जन्माला दैत्या तळफाटा सुटला’ या अभंगावरून श्रीकृष्णाने जन्म घेऊन आपली लीला केली, याचे वर्णण केले तसेच ‘चरित्र ते उत्तरावे गेले देव गोकुळी’ या अभंगावर श्रीधर कृष्ण आवारे यांनी हजारो भक्तांना काल्याच्या कीर्तनातून उद्बोधन केले.

Shree's death anniversary concludes | श्रींच्या पुण्यतिथी उत्सवाची सांगता

श्रींच्या पुण्यतिथी उत्सवाची सांगता

Next
ठळक मुद्दे श्रीधर बुवा आवारे यांचे काल्याचे कीर्तनहजारो भक्तांच्या उपस्थित दहीहंडी पूजन व गोपालकाल्याने उत्सवाची सांगता


शेगाव: श्रींच्या पुण्यतिथी उत्सवाची सांगता रविवारी श्रीधर बुवा आवारे यांचे काल्याचे कीर्तन होऊन दहीहंडी पूजन व गोपालकाल्याने हजारो भक्तांच्या उपस्थित करण्यात आली.
‘कृष्ण गोकुळी जन्माला दैत्या तळफाटा सुटला’ या अभंगावरून श्रीकृष्णाने जन्म घेऊन आपली लीला केली, याचे वर्णण केले तसेच ‘चरित्र ते उत्तरावे गेले देव गोकुळी’ या अभंगावर श्रीधर कृष्ण आवारे यांनी हजारो भक्तांना काल्याच्या कीर्तनातून उद्बोधन केले.
सकाळी श्रींच्या मंदिरात दहीहंडीचे पूजन विश्‍वस्त विश्‍वेश्‍वर त्रिकाळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी हजारो भक्तांनी गोपाळकाला प्रसादाचा लाभ घेतला. श्रींच्या १0७ व्या पुण्यतिथी यात्रा महोत्सवात        २२    ते २६ पावेतो संतनगरीत     हजारो भक्तांनी उपस्थिती लावून विविध धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घेतला. संस्थानच्या वतीने भक्तांच्या सेवेसाठी २२ ते २६ पावेतो    महाप्रसाद, भजनी साहित्य वाटप व वैद्यकीय उपचार, औषध आदी    सोयी-सुविधा देण्यात आल्या. वारकरी प्रसन्न मनाने परतीच्या प्रवासाला निघाले.
श्री गजानन महाराज संस्थानच्या अन्य शाखेतही श्रींचा पुण्यतिथी उत्सव भक्तिपूर्ण वातावरणात साजारा करण्यात आला. यात श्रीक्षेत्र पंढरपूर शाखा, आळंदी, ओंकारेश्‍वर, त्र्यंबकेश्‍वर, गिरडा या व अन्य शाखांमध्येही महाप्रसादाचे वाटप करून पुण्यतिथी महोत्सव साजरा करण्यात आला. 
श्रींचे भक्त भजनी दिंड्यांसह  काल्याचे कीर्तन व गोपाळकाल्याचा प्रसाद घेऊन परतीच्या प्रवासाला निघाले. 

Web Title: Shree's death anniversary concludes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.