‘श्रीं’ची पालखी आज शेगावात

By Admin | Published: August 21, 2015 01:38 AM2015-08-21T01:38:47+5:302015-08-21T01:38:47+5:30

पंढरपूर येथून परतीच्या मार्गावर असलेल्या संत गजानन महाराजांची पालखी शुक्रवारी सकाळी शेगावात दाखल होत आहे.

Shree's palikhi today in Shagat | ‘श्रीं’ची पालखी आज शेगावात

‘श्रीं’ची पालखी आज शेगावात

googlenewsNext

खामगाव (जि. बुलडाणा): : पंढरपूर येथून परतीच्या मार्गावर असलेल्या संत गजानन महाराजांची पालखी शुक्रवारी सकाळी शेगावात दाखल होत आहे. गुरूवारी पालखीचे खामगावात मोठय़ा उत्साहात स्वागत करण्यात आले. खामगावकरांच्या स्वागतानंतर कृतार्थ झालेल्या वारकर्‍यांसोबत शुक्रवारी सकाळी लाखावर भाविक शेगावकडे पायी पायी मार्गस्थ होतात. खामगाव शेगाव मार्गावर सकाळी ४ ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत भक्तांचा महापूर असतो. त्यामुळे या मार्गावरील वाहतुक १२ तास बंद ठेवण्यात येणार आहे. संपूर्ण जिल्हाभरातुन भक्त सायंकाळी खामगावात दाखल झाले असून सकाळी पालखी सोबतच शेगावला मार्गस्थ होणार आहे. शेगाव -खामगाव या १८ किमी मार्गावर भक्तांच्या सोयीसाठी ठिकठिकाणी पाणपोई तसेच अल्पोपहाराचे स्टॉल लावण्यात आले असून, प्रथमच टॉवर उभारून ध्वनिपेक्षकावर गजानन धून लावण्यात येणार आहे.

Web Title: Shree's palikhi today in Shagat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.