३१ मे रोजी श्रींच्या पालखीचे प्रस्थान

By admin | Published: May 16, 2017 01:09 AM2017-05-16T01:09:21+5:302017-05-16T01:09:21+5:30

शेगाव : आषाढी एकादशी यात्रा महोत्सवात सहभागी होण्याकरिता श्री गजानन महाराजांची पालखी वारकरी भक्तांसमवेत ज्येष्ठ शु.६ बुधवार, ३१ मे ला सकाळी मंगलमय वातावरणात प्रस्थान होत आहे.

Shree's Palkhi departure on May 31 | ३१ मे रोजी श्रींच्या पालखीचे प्रस्थान

३१ मे रोजी श्रींच्या पालखीचे प्रस्थान

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शेगाव : श्री गजाननाच्या पंढरीतून श्री विठ्ठलाच्या पंढरीत आषाढी एकादशी यात्रा महोत्सवात सहभागी होण्याकरिता श्री गजानन महाराजांची पालखी वारकरी भक्तांसमवेत ज्येष्ठ शु.६ बुधवार, ३१ मे ला सकाळी मंगलमय वातावरणात प्रस्थान होत आहे.
श्रींच्या पालखीचे प्रस्थान होण्यापूर्वी ब्रह्ममुहूर्तावर मंगलमय वातावरणात श्रींच्या समाधी मंदिराच्या बाजूला श्रींच्या रजतमुखवट्याची विधीवत पूजा करण्यात येते व हरिनामाच्या गजरात टाळ, मृदंगाच्या निनादात श्रींच्या रजत मुखवट्याची सुशोभित पालखीत प्रतिष्ठापना करण्यात येऊन विधिवत पूजा करण्यात येते.
श्रींच्या पालखीला श्रींचे प्रगटस्थळ, देशमुख यांच्या मळ्यात वारकऱ्यांना फराळ, चहा देण्यात येतो. तद्नंतर श्रींची पालखी बुधवार, ३१ ला श्री क्षेत्र नागझरीकडे प्रस्थान करीत आहे. संतनगरीतील हजारो भक्तगण आपल्या लाडक्या राजाला पे्रमने निरोप देतात. श्रींच्या पालखीचे हे ५० वे वर्ष आहे.

Web Title: Shree's Palkhi departure on May 31

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.