शेगावात लाखो भाविकांनी घेतले श्रींचे दर्शन
By admin | Published: January 2, 2015 12:47 AM2015-01-02T00:47:32+5:302015-01-02T00:47:32+5:30
नववर्षाचे जोरदार स्वागत :भरपावसातही भक्तांचा ओघ कायमच.
शेगाव (बुलडाणा) : जिल्ह्यात सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. शेगावात आज श्रींच्या भक्तांनी 'श्री'चे दर्शन घेऊन नववर्षाची सुरुवात केली. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी गुरुवार व एकादशी आल्याने शेगाव शहर आज भाविकांनी फु लून गेले होते.
दर्शनासाठी उसळलेल्या गर्दीमुळे संस्थानच्यावतीनेही विशेष व्यवस्था करण्यात आली होती. शहरात मात्र वाहनांच्या पार्कींगसाठीही जागा नव्हती. त्यातच सकाळपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसाने १0 वाजेनंतर जोर पकडला. संस्थानच्यावतीने भक्तांची आबाळ होऊ नये म्हणून विशेष काळजी घेण्यात आली होती.
रोकडिया नगरमधील श्री सप्तश्रृंगी देवीमाता मंदिराच्या भव्य प्रांगणात आज १ जानेवारीला श्री गजानन विजय ग्रंथाचे हजारो भाविकांनी पारायण केले. या सोहळ्याचे व्यासपीठ नेतृत्व हभप सोपान महाराज खोंड जवळा व लक्ष्मण महाराज कोकाटे, सावरपाटी यांनी केले, तर रात्री श्री गजानन भक्त मंडळ, कालवड यांची भजन संध्या कार्यक्रम संपन्न झाला.