'श्रीं'ची पालखी संतनगरीत दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 06:23 PM2018-08-17T18:23:49+5:302018-08-17T18:27:13+5:30
शेगाव : आषाढी यात्रा महोत्सव आटोपून श्री क्षेत्र पंढरपूर येथून निघालेली श्रींची पालखी १७ आॅगस्टरोजी संतनगरीत दाखल झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
शेगाव : आषाढी यात्रा महोत्सव आटोपून श्री क्षेत्र पंढरपूर येथून निघालेली श्रींची पालखी १७ आॅगस्टरोजी संतनगरीत दाखल झाली. या पालखी सोहळ््यात बुलडाणा जिल्ह्यातील हजारो भाविक सहभागी झाले होते. श्री गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर सकाळी ११ वाजता श्रींच्या पालखीचे स्वागत श्रीकांतदादा पाटील, शरद शिंदे, ज्ञानेश्वर पाटील यांनी केले. यानंतर श्रींची पालखी श्री गजानन वाटिका येथे पोहचली. यावेळी श्रींच्या पालखीचे स्वागत कार्यकारी विश्वस्त नीळकंठदादा पाटील यांनी केले. याप्रसंगी अध्यक्ष श्री गजानन महाराज संस्थान नारायणराव पाटील, डॉ.रमेश डांगरा, गोविंदराव कलोरे, अशोकराव देशमुख, किशोर टांक, पंकज शितुत, चंदुलाल अग्रवाल, विश्वेश्वर त्रिकाळ आदिंची प्रामुख्याने उपस्थिती होती. श्रींच्या पालखीत सहभागी वारकºयांना महाप्रसाद घेवून श्रींची पालखी नगर परिक्रमेकरीता ठिक २ वाजता विधीवत पूजन करून मार्गस्थ झाली. श्रींच्या पालखीचे नगर परिक्रमेदरम्यान विविध ठिकाणी रांगोळी काढून श्रींच्या वारकºयांना पाणी वाटप, चहा वाटप, करून आपली श्रींच्या प्रती सेवा अर्पण केली. ठिकठिकाणी चौकात मनोभावे श्रींचे स्वागत व दर्शन भक्तांनी घेतले. श्रींची पालखी मंदीरात सायंकाळी ठिक ६ वा. दाखल झाली. याठिकाणी वारकºयांच्या चेहºयावरील आनंद वाखाणण्या जोगा होता. गण गण गणात बोते, या अभंगाच्या तालावर टाळ मृदंगाच्या तालावर वारकºयांचा आनंद व्दिगुणीत झाला. याप्रसंगी आरती करण्यात आली. श्री गजानन महाराज संस्थानचे व्यवस्थापक व विश्वस्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांच्यासह अध्यक्ष नारायणराव पाटील, कार्यकारी विश्वस्त नीळकंठदादा पाटील, डॉ.रमेश डांगरा, गोविंदराव कलोरे, अशोकराव देशमुख, पंकज शितुत, किशोर टांक, विश्वेश्वर त्रिकाळ, चंदुलाल अग्रवाल, प्रमोद गणेश, राजेंद्र शेगोकार, अभियांत्रिकी महाविद्यालय शरद शिंदे, रामेश्वर काठोळे आदिंची उपस्थिती होती. श्रींच्या मंदीरात भक्तांची मोठ्या प्रमाणात श्रींचे दर्शनासाठी गर्दी होती. शांततेत उत्सवाची पालखी सांगता करण्यात आली.
श्री संस्थानच्यावतीने महाप्रसाद
श्री गजानन महाराज संस्थानच्यावतीने २५ हजार भक्तांना महाप्रसादाचे वाटप मंदीरात शिस्तीत व बसुन देण्यात आले तर श्री गजानन वाटीका येथे श्रींच्या पालखीत खामगाव ते शेगाव वारीत सहभागी २५ हजाराच्यावर भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.